मालवणी कोळंबी कढी- Malvani Prawns Curry in Marathi
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Main
Cuisine: Indian
Ingredients
कितीजणांसाठी बनेल : ४-५
तयारीसाठी वेळ : २० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
साहित्य:
३५० ग्रॅम्स कोळंबी साफ करून , मधला काळा दोर काढून , स्वच्छ धुऊन
२ मोठे कांदे = १५० ग्रॅम्स ( एक कांदा तुकडे करून , आणि एक कांदा चिरून )
पाव कप ताजी कोथिंबीर
७-८ बेडगी सुक्या लाल मिरच्या
तेल
अडीच कप = २५० ग्रॅम्स ताजा खवलेला नारळ
५-६ कढीपत्ता
१ टीस्पून जिरे
पाव टीस्पून काळी मिरे
१ टीस्पून धणे
७-८ लसणीच्या पाकळ्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
१ टीस्पून हळद
१ टीस्पून तांदळाचे पीठ
५-६ कोकम
मीठ चवीनुसार
Instructions
कृती:
कोळंबीला हळद आणि मीठ चोळून १५-२० मिनिटे मुरायला ठेवावी .
मिक्सरमधून किसलेला नारळ, कांद्याचे तुकडे, सुक्या मिरच्या , कोथिंबीर, लसूण ,आले , धणे , जिरे , काळी मिरे हे सगळे साहित्य १ ते दीड कप पाणी घालून बारीक वाटून घ्यायचेय . जितके बारीक वाटले जाईल तितके दूध दाटसर निघेल . फक्त मिक्सर फार वेळ फ्रीवू नये जेणेकरून तो गरम होईल . नाहीतर दुधात नारळाचा तेलकट अंश उतरतो .
हा नारळाचा वाटलेला चव एका गाळणीवर स्वच्छ सुती कापड अंथरून त्यातून गाळून घ्यावा . साधारण २ कप दूध निघते .
एका कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात कढीपत्त्याची फोडणी करून घ्यावी . मग बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी घालून एकत्र करून घ्यावी . साधारण १ मिनिट मध्यम आचेवर कोळंबी शिजवून घेतली की आच मंद करून त्यात नारळाचे पिळलेले दूध घालून पटकन हलवून घ्यावे . मंद आचेवर शिजू द्यावे .
तांदळाचे पीठ ३-४ टेबलस्पून पाण्यात सैल करून घ्यावे आणि या कढीत मिसळावे म्हणजे कढीला दाटपणा येतो .
झाकण घालून कढी मंद आचेवर शिजू दयावे .
३-४ मिनिटांनंतर कोकमं घालून घ्यावीत . चवीपुरते मीठ घालून काही मिनिटे अजून कढी शिजू द्यावीत. कोणतयाही परिस्थतीत मोठ्या आचेवर कढी उकळू देऊ नये नाहीतर नारळाचे दूध फाटते .
२ मिनिटांनी गॅस बंद करून , झाकण घालून कढी मुरू द्यावी . जराशी वाफ गेली की ऊन ऊन भातासंगे वाढावी .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/malvani-prawns-curry-in-marathi/