२५० ग्रॅम्स बोनलेस चिकन , स्वच्छ धुऊन आणि सुमारे एक ते दीड इंचाचे तुकडे करून
पाऊण कप = १०० ग्रॅम्स बेसन
१ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
अर्धा टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार
पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
८-१० लसणीच्या पाकळ्या
अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
अर्धा टीस्पून भाजलेली जिरे पावडर
अर्ध्या लिंबाचा रस
अर्धा टीस्पून धणे पावडर
पाव टीस्पून आमचूर पावडर
पाणी गरजेनुसार
तेल
पद्धत २:
२५० ग्रॅम्स बोनलेस चिकन , स्वच्छ धुऊन आणि सुमारे एक ते दीड इंचाचे तुकडे करून
अर्धा कप = ५० ग्रॅम्स बेसन
२-३ टेबलस्पून तांदळाचे पीठ
१ अंडे
पाव टीस्पून हळद
१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर
मीठ चवीनुसार
४ हिरव्या मिरच्या
८-१० लसणीच्या पाकळ्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
पाव कप कोथिंबीर
१० -१२ कढीपत्ता
१ लहान कांदा = ४० ग्रॅम्स
अर्ध्या लिंबाचा रस
पाणी गरजेनुसार
तेल
Instructions
कृती :
पद्धत १:
हिरवी मिरची , आले आणि लसूण १ टेबलस्पून किंवा लागेल तेवढे पाणी वापरून बारीक वाटून घ्यावे .
एका मोठ्या बाऊलमध्ये हिरवे वाटण , लिंबाचा रस ,लाल मिरची पूड , आमचूर पावडर , जिरे पावडर , धणे पावडर , चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यावे .यात चिकनचे तुकडे घालून नीट घोळून घ्यावेत . ३० ते ४० मिनिटांसाठी मॅरीनेट होऊ द्यावे .
बेसनाचे मिश्रण बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन , कॉर्न फ्लोअर , ओवा, मीठ चवीपुरते , बारीक चिरलेली कोथिंबीर , आणि १ टेबलस्पून कडकडीत गरम केलेलं तेल घालून एकत्र करून घ्यावे . साधारण २/३ कप पाणी घालून हे मिश्रण जरासे घट्टच फेटावे . बाजूला झाकून ठेवावं .
पद्धत २:
चिकन मॅरीनेट करण्यासाठी आले , लसूण , हिरव्या मिरच्या , कढीपत्ता , कांदा , कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून जाडसर वाटून घ्यावे .
एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे, वाटलेला मसाला , लाल मिर्च पूड , गरम मसाला पावडर , हळद , चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . त्यात १ अंडे फोडून घालावे . बेसन , तांदळाचे पीठ घालून एकत्र करून घ्यावे . हे चिकनचे तुकडे असेच मिश्रणात ३० -४० मिनिटे ठेवून द्यावे .
पकोडे तळण्यासाठी कढईत तेल व्यवस्थित मध्यम आचेवर गरम करून घ्यावे . मग पहिल्या पद्धतीने मॅरिनेड केलेले चिकनचे तुकडे बेसनाच्या मिश्रणात घोळवून मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत .
दुसऱ्या पद्धतीने मॅरिनेड केलेलं चिकनचे तुकडे डायरेक्ट तेलात घालावेत आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यावे .
हे चिकन पकोडे पार्टी स्टार्टर्स म्हणून टोमॅटो केचअप किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खावयाला देऊ शकता !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chicken-pakoda-recipe-marathi/