Malvani Masala recipe in Marathi- मालवणी मसाला- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Cuisine: Indian
Ingredients
किती बनेल : ४५० ग्रॅम्स
साहित्य: :
२०० ग्रॅम्स बेडगी सुक्या लाल मिरच्या
५० ग्रॅम्स संकेश्वरी सुक्या लाल मिरच्या
५० ग्रॅम्स पांडी किंवा लवंगी सुक्या लाल मिरच्या
२ टीस्पून जिरे
२ टीस्पून बडीशेप
२ टीस्पून शाही जिरे
१ टीस्पून मेथी दाणे
२ टीस्पून खसखस
१ टेबलस्पून मसाला वेलच्या
१ टीस्पून हिरवी वेलची
१ टेबलस्पून धणे
१ टेबलस्पून त्रिफळ
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून काळी मिरी
५ ग्रॅम्स जायफळ
१ टीस्पून लवंग
२ टीस्पून नागकेशर
१ टेबलस्पून कबाबचिनी
३ लहान हिंगाचे खडे
१ टीस्पून चक्रीफूल
१ टेबलस्पून जावित्री
१ फूल मायपत्रीचे
३ हळकुंड
२ टेबलस्पून दगडफूल
४ इंच दालचिनी
१०-१२ तमालपत्र
Instructions
कृती:
मिरच्यांना २-३ उन्हे दाखवून घ्यावीत त्यामुळे मसाला चांगला टिकतो त्यात पोरकिडे व्हायचा धोका कमी होतो !
सगळ्या मिरच्या देठे काढून एका मोठ्या जाड बुडाच्या लोखंडी कढईत बॅचेस मध्ये मंद आचेवर भाजून घ्यावीत . चांगल्या चुरचुरीत झाल्या पाहिजेत परंतु त्याचबरोबर त्या करपणार नाहीत याची दक्षता घ्यावी .
भाजलेल्या मिरच्या एका परातीत पसरून नैसर्गिक रित्या थंड होऊ द्याव्यात , पंख्याखाली ठेवू नयेत !
सगळे खडे गरम मसाले एका मागोमाग एक कढईत मंद आचेवर त्यांचा सुगंध दरवळेपर्यंत भाजून घ्यावेत .
खाली मी प्रत्येक साहित्याला भाजण्यासाठी लागलेला वेळ लिहीत आहे .
गरम मसाले भाजून झाले की ते एका ताटलीत काढावेत आणि एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करावे आणि मंद आचेवर हिंगाचे खडे तळून घ्यावेत. खड्यांचा रंग खरपूस झाला की काढून घ्यावेत .
थंड झाल्यावर मिक्सरमधून मिरच्या बारीक वाटून त्यांची पूड करावी . वाटलेली पूड चाळणीतून चाळून राहिलेले मिरचीचे चाड परत मिक्सरला लावावे . आणि अशाप्रकारे छान बारीक पूड वाटून घ्यावी . अशाच प्रकारे गरम मसाला व हिंग एकत्र बारीक वाटून घ्यावे .
मिरची पूड आणि गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यावा . मिक्सरला लावून एकत्र ब्लेंड केला तरी चालेल .
सुमारे ४५० ग्रॅम्स चा मालवणी मसाला तयार !
मिरच्यांच्या ४ बॅचेस भाजायला प्रत्येकी ४ मिनिटे
धणे ३ मिनिटे
जिरे , शाही जिरे , मोहरी, त्रिफळ, लवंगा, नागकेशर प्रत्येकी १ मिनिट