Gavachi Kheer recipe in Marathi-खपली गव्हाची खीर- How to make Wheat Kheer- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ :४५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ: २० मिनिटे
कितीजणांना पुरेल: ४-५
साहित्य:
  • १ कप = १८० ग्रॅम्स खपली गहू , स्वच्छ निवडून , पाण्याने धुऊन , ४५ मिनिटे भिजवत ठेवावे
  • २ टेबलस्पून तांदूळ , स्वच्छ धुऊन , ४५ मिनिटे पाण्यात भिजवून त्यानंतर खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावेत
  • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेला ताजा नारळ
  • दीड कप = ३०० ग्रॅम्स गूळ ( शक्यतो सेंद्रिय गूळ घ्यावा )
  • १ टेबलस्पून काजू बारीक तुकडे करून
  • १ टेबलस्पून मनुका
  • १ टेबलस्पून बदामाचे काप
  • १ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप
  • दीड टीस्पून सुंठ पावडर
  • अर्धा टीस्पून मीठ
  • अर्धा लिटर दूध
  • तूप गरजेनुसार
Instructions
कृती:
  1. भिजवलेले गहू आणि तांदूळ प्रेशर कूकरमध्ये घालावेत . मीठ घालावे आणि बुडेल इतकेच पाणी घालावे . मध्यम आचेवर ३-४ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यावेत . कुकर थंड झाल्यावरच उघडावा आणि शिजलेले गहू व तांदूळ एका ताटलीत काढून घ्यावेत .
  2. एका कढईत ४ टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे . सुका मेवा म्हणजेच सुक्या खोबऱ्याचे काप , बदामाचे काप , काजूचे तुकडे आणि मनुका तुपात परतून घ्याव्यात . हा सुका मेवा एका ताटलीत काढून घ्यावा .
  3. त्याच तुपात गूळ घालून वितळू द्यावा . ओले खोबरे आणि सुंठ पावडर घालून एकत्र करावा .
  4. नंतर तुपात परतलेला सुका मेवा घालावा . शिजवलेले गहू आणि तांदूळ सुद्धा घालून एकत्र करून घ्यावे . मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजवावे .
  5. नंतर आच बंद करावी आणि कोमट झालेले दूध घालून एका हाताने खीर ढवळून घ्यावी . अति गरम दूध घातले तर गुळामुळे दूध फाटते .
  6. आचेवर परत ठेवून खीर मंद आचेवर शिजू द्यावी. ही खीर घट्ट चांगली लागते . खीर घट्ट झाली की आचेवरून खाली उतरवावी आणि सुक्या मेव्याने सजवून वरून साजूक तुपाची धार घालून खावयास द्यावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/gavachi-kheer-recipe-in-marathi/