भिजवलेले गहू आणि तांदूळ प्रेशर कूकरमध्ये घालावेत . मीठ घालावे आणि बुडेल इतकेच पाणी घालावे . मध्यम आचेवर ३-४ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यावेत . कुकर थंड झाल्यावरच उघडावा आणि शिजलेले गहू व तांदूळ एका ताटलीत काढून घ्यावेत .
एका कढईत ४ टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे . सुका मेवा म्हणजेच सुक्या खोबऱ्याचे काप , बदामाचे काप , काजूचे तुकडे आणि मनुका तुपात परतून घ्याव्यात . हा सुका मेवा एका ताटलीत काढून घ्यावा .
त्याच तुपात गूळ घालून वितळू द्यावा . ओले खोबरे आणि सुंठ पावडर घालून एकत्र करावा .
नंतर तुपात परतलेला सुका मेवा घालावा . शिजवलेले गहू आणि तांदूळ सुद्धा घालून एकत्र करून घ्यावे . मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजवावे .
नंतर आच बंद करावी आणि कोमट झालेले दूध घालून एका हाताने खीर ढवळून घ्यावी . अति गरम दूध घातले तर गुळामुळे दूध फाटते .
आचेवर परत ठेवून खीर मंद आचेवर शिजू द्यावी. ही खीर घट्ट चांगली लागते . खीर घट्ट झाली की आचेवरून खाली उतरवावी आणि सुक्या मेव्याने सजवून वरून साजूक तुपाची धार घालून खावयास द्यावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/gavachi-kheer-recipe-in-marathi/