Mumbai Bhel Puri recipe in Marathi- चमचमीत ओली भेळ- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : ५ मिनिटे
साहित्य:
२ कप = ५० ग्राम कुरमुरे
१ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स बारीक चिरलेला
१ मध्यम आकाराचा टोमॅटो = ८० ग्राम बारीक चिरलेला
१ मध्यम आकाराचा बटाटा = ८० ग्राम उकडून बारीक चौकोनी तुकडे करून
हिरवी कोथिंबीर पुदिन्याची चटणी
लसणाची लाल चटणी
चिंच खजुराची गोड चटणी
चपट्या शेवपुरीच्या पापड्या आणि पाणीपुरीच्या पुऱ्या
अर्धा कप तिखट गाठी
अर्धा कप भावनगरी गाठी
अर्धा कप बारीक नायलॉन शेव
पाव कप मसाला शेंगदाणे
पाव कप बारीक चिरलेली कोथींबीर
१ टीस्पून चाट मसाला
पाव टीस्पून काळे मीठ
१ टेबलस्पून लिंबाचा रस
Instructions
कृती:
कुरमुरे व्यवस्थित साफ करून मग एका मोठ्या कढईत मंद आचेवर भाजून घ्यावेत . ४-५ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत , फक्त त्यांचा रंग बदलू देऊ नये .
एका मोठ्या भांड्यात कुरमुरे , चिरलेला कांदा , टोमॅटो , बटाटा आणि लिंबाचा रस घालून एकत्र करावे . मसाला शेंगदाणे , व इतर फरसाण सुद्धा घालावे . चाट मसाला , काळे मीठ आणि पापडी व पुऱ्या चुरून घालाव्यात .
नंतर आवडीनुसार लागेल तेवढ्या चटण्या घालाव्यात ( मी ३ टेबलस्पून हिरवी चटणी , १ टेबलस्पून लाल चटणी आणि ५ टेबलस्पून चिंच खजुराची चटणी घातली आहे ) . व्यवस्थित एकत्र करून घ्याव्यात .
चटपटीत भेळ तयार आहे , सर्व करताना मस्त फरसाण आणि लिंबू पिळून खायला द्यावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/mumbai-bhel-puri-in-marathi/