Anda Keema Ghotala recipe in Marathi-अंडा खिमा घोटाळा- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ: १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
कितीजणांना पुरेल : ३-४
साहित्य:
२ कच्ची अंडी आणि ३ उकडलेली अंडी
१ मोठा कांदा = ९० ग्रॅम्स बारीक चिरलेला
२ मध्यम टोमॅटो =१२५ ग्रॅम्स बारीक चिरलेले
२-३ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
१ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
अर्धा टीस्पून जिरे
पाव टीस्पून हळद
१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
१ टीस्पून धणे पावडर
१ टीस्पून पाव भाजी मसाला
१ टीस्पून चाट मसाला
मीठ चवीनुसार
तेल
Instructions
कृती:
एका कढई मध्ये ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात जिरे घालून तडतडू द्यावे . हिरव्या मिरच्या व कांदा घालून मध्यम ते मोठ्या आचेवर नरम होईपर्यंत परतून घ्यावे .
मग आले लसणाची पेस्ट घालून त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी . पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यावी .
आता चिरलेले टोमॅटो घालून त्यात थोडे मीठ घालावे . आच बारीक करून टोमॅटो मंद आचेवर शिजू द्यावेत .
टोमॅटो शिजले की हळद, लाल मिरची पूड , धणे पावडर , पाव भाजी मसाला आणि चवीपुरते मीठ घालून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
७-८ मिनिटे मसाला परतून घेतला की त्यात थोडे पाणी घालावे . किसणीने ( मध्यम आकारांच्या छिद्राने ) उकडलेली अंडी किसून घालावीत .
अंडी चमच्याने व्यवस्थित मॅश करून घ्यावीत . मग आच मंद करून एक कच्चे अंडे फोडून घालावे . नीट एकत्र करून अजून थोडे पाणी घालावे ( टोटल १ कप पाणी वापरले आहे ) . वरून चाट मसाला भुरभुरावा . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
दुसऱ्या आचेवर एका पॅन मध्ये १-२ टेबलस्पून तेल घालावे . त्यात उरलेले कच्चे अंडे फोडून घालावे . त्यावर मीठ, चाट मसाला आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी . बाजूने गरम तेल चमच्याने वर घालावे म्हणजे अंडे वरूनही शिजेल .
अंड्याची ग्रेव्ही आपण ५ मिनिटे शिजू दिलीय . त्यात आता हे अंड्याचे फुल्ल फ्राय घालावे . ते नीट एकत्र करून घ्यावे .
या रेसिपीमध्ये आपण अंडे ३प्रकारे वापरली - कच्चे , उकडलेले आणि फुल्ल फ्राय म्हणूनच हा घोटाळा एकदम मजेशीर आहे .
हा अंडा खिमा घोटाळा थोडासा दाटसर रस्साच असावा कारण आपल्याला तो पावासोबत खायचा आहे . त्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक्कत्र करावी . अंडा घोटाळा भाजलेल्या पावांसोबत खावयास द्यावा .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/anda-keema-ghotala-in-marathi/