Mexican Rice recipe in Marathi- मेक्सिकन राईस- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Main
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
कितीजणांना पुरेल : ३-४
साहित्य :
  • १ कप = २०० ग्रॅम्स लांब दाण्यांचा बासमती तांदूळ , स्वच्छ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजवून त्यानंतर एका चाळणीत निथळून ठेवावा
  • १ मोठा कांदा = १२५ ग्रॅम्स लांब चिरलेला
  • पाव कप = २५ ग्रॅम्स मक्याचे दाणे
  • अर्धा कप = ६० ग्रॅम्स भोपळी मिरची ( लाल /हिरवी) बारीक चिरून
  • पाव कप = ६० ग्रॅम्स राजमाची दाणे उकडून
  • ५-६ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
  • ४ हिरव्या मिरच्या लांब मध्ये चिरून
  • अर्धा टीस्पून जाडसर कुटलेली काळी मिरी
  • अर्धा टीस्पून ओरेगॅनो
  • १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
  • १ टीस्पून भाजलेली जिरे पावडर
  • २ मध्यम आकाराचे टोमॅटो १५० ग्रॅम्स प्युरी करून
  • मीठ चवीनुसार
  • तेल
Instructions
कृती:
  1. एका प्रेशर कूकरमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालून १-२ मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावेत . त्यामुळे तांदूळ थोडे कडक बनतात आणि चमकदार सुद्धा .. असे तांदूळ शिजवल्यावर गाळ होत नाहीत . एका ताटात काढून घ्यावेत.
  2. २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. त्यात लसणाची फोडणी करून लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी . लांब चिरलेला कांदा घालून तो सुद्धा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा .
  3. ३-४ मिनिटांनंतर मक्याचे दाणे , भोपळी मिरची, उकडलेले राजमा घालून फक्त ३० सेकंद घालून परतावे . आता मसाले - लाला मिरची पूड, जिरे पावडर, ओरिगानो , काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे. २० सेकंद परतून घ्यावे .
  4. टोमॅटोची प्युरी आणि हिरव्या मिरच्या ( किंवा आलापिनो मिरच्या ) घालून झाकण घालून मिनिटभर शिजू द्यावे .
  5. नंतर प्युरी एकत्र करून ह्यावी व त्यात तांदूळ घालावे. तांदळाच्या दुप्पट म्हणजेच २ कप पाणी घालावे. कूकरचे झाकण घट्ट बंद करून मोठ्या आचेवर शिजु द्यावे .
  6. साधारण ३ मिनिटे मोठ्या आचेवर कूकरमध्ये प्रेशर निर्माण होते . शिट्टी काढायची नाहीये . जसे शिट्टी येईल असे वाटतेय तेवढ्यात गॅस बंद करावा . वाफेत भात आतमध्ये शिजू द्यावा . प्रेशर थांबले की मगच कुकर उघडावा .
  7. रंगीबेरंगी भाज्या घालून बनवलेला हा पौष्टिक मेक्सिकन राईस डब्यासाठी किंवा झटपट लंच म्हणून खूप छान !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/mexican-rice-recipe-in-marathi/