२ टेबलस्पून तेल एका पॅनमध्ये घालून त्यात लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी . कांदा घालून चांगला ७-८ मिनिटे खरपूस परतून घ्यावा . कोथिंबीर , भाजलेले खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . वाटण थंड झाल्यावर पाऊण कप पाणी साधारण वापरून बारीक वाटून घ्यावे .
टोमॅटो पाणी न घालता प्युरी करून घ्यावी . पाव कप काळे वाटाणे मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे .
३-४ टेबलस्पून तेल कढईत गरम करावे . त्यात कढीपत्ता व हिंगाची फोडणी करावी . तेलात हळद व मालवणी मसाला घालून लगेच परतावा नाहीतर करपतो . वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे . चवीनुसार मीठ घालावे आणि वाटलेली वाटाण्याची पेस्ट घालावी . नीट एकत्र करून घ्यावे .
मसाला कोरडा पडला तर शिजलेल्या वाटाण्याचे बाजूला काढलेले पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यावा .
उकडलेले वाटाणे घालावेत व शिजलेल्या वाटाण्याचे पाणी ( २ कप ) आणि वरून अजून गरम पाणी ( २ कप ) घालावं . मध्यम आचेवर सांबाराला एक उकळी येऊ द्यावी .
उकळी फुटली की आच मंद करावी आणि झाकण घालून शिजू द्यावे . ५-६ मिनिटांनी टोमॅटोची प्युरी घालून मंद आचेवर शिजू द्यावे जोपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा निघून जात नाही .
६-७ मिनिटांत सांबार शिजून तयार होते . गॅस बंद करून वाढेपर्यंत झाकण घालावे म्हणजे ते जरा चांगले मुरते .
आंबोळी , घावन किंवा वड्यांसोबत वाढावे .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/kala-vatana-sambar-in-marathi/