Instant Rava Dhokla recipe in Marathi- रवा ढोकळा रेसिपी- झटपट रवा ढोकळा- Kali Mirch By Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ : २० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
कितीजणांना पुरेल : ३-४
साहित्य:
१ कप = २०० ग्रॅम्स बारीक रवा ( बॉम्बे रवा )
पाऊण कप = १८० ग्रॅम्स दही
४ हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
अर्धा टीस्पून मीठ
अर्ध्या लिबचा रस
दीड टीस्पून साखर
पाव कप कोथिंबीर
२ इनो रेग्युलर ( चवविरहित ) ) पाकीट ( ५ ग्राम प्रत्येकी )
अर्धा टीस्पून मोहरी
१ टीस्पून पांढरे तीळ
चुटकीभर हिंग
१० -१२ कढीपत्ता
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
पाव टीस्पून लाल मिरची पूड
१-२ टेबलस्पून तेल
पाणी गरजेनुसार
Instructions
कृती :
आल्याचे तुकडे, मिरच्या आणि २ टेबलस्पून कोथिंबीर मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी .
एका बाऊलमध्ये दही , वाटलेला मसाला , मीठ , साखर आणि लिंबाचा रस घालून नीट फेटून घ्यावे , गुठळ्या राहू देऊ नयेत .
अर्धा कप पाणी घालून मिश्रण पातळ करून घ्यावे . यात थोडा थोडा रवा घालून नीट एकत्र करून घ्यावे . १ टीस्पून तेल घालावे म्हणजे ढोकळा आतून लुसलुशीत बनतो . अजून पाव कप पाणी घालून एकत्र ढवळून घ्यावे . हे मिश्रण झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवावे .
एका प्रेशर कुकर मध्ये २ कप पाणी उकळत ठेवावे . ढोकळ्याच्या मिश्रणाला झाकून १५ मिनिटे झाली की कुकर च्या डब्याला आतून तेल लावून घ्यावं. मिश्रणात इनो घालून वरून १-२ टीस्पून पाणी घालावे . ऍक्टिव्हेट झालेले इनो मिश्रणात नीट ढवळुन घ्यावं , मिश्रणावर बुडबुडे दिसू लागतात ! वेळ न दवडता लगेच हे मिश्रण डब्यात ओतून घयावे . हा डबा कूकरमध्ये एका स्टॅण्डवर ठेवून कूकरचे झाकण लावून घ्यावे , शिटी काढून टाकावी . मोठ्या आचेवर २ मिनिटे वाफ बाहेर यूएईपर्यंत शिजवावे नंतर आच मंद करून १२ -१३ मिनिटे वाफवून घ्यावे .
गॅस बंद करून कुकर जरा थंड झालयावर उघडावा . ढोकळा थंड झाला की डब्याच्या कडेने सूरी गोल फिरवून त्याच्या कांदा सैल करून घ्याव्यात आणि एका ताटात काढावा .
लाल मिरची पूड वरून भुरभुरावी . आपल्या हव्या त्या लहान मोठ्या आकारात ढोकळा चौकोनी कापून घ्यावा .
१ -२ टेबलस्पून तेल गरम करून त्यात तीळ खरपूस तळून घ्यावेत . नंतर त्यात मोहरी , हिंग , होरवी मिरची आणि कढीपत्ता घालून चरचरीत फोडणी करून घ्यावी . ही फोडणी ढोकळ्यावर घालावी . मस्त रव्याचा लुसलुसुशीत मऊ ढोकळा तयार !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/instant-rava-dhokla-in-marathi/