Surmai Curry –Konkani style | सुरमईचे कालवण- Surmai Fish Curry- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
कितीजणांना पुरेल : ४-५
साहित्य:
  • ५०० ग्रॅम्स सुरमई , स्वच्छ धुऊन , मध्यम आकाराच्या तुकड्यांत कापून
  • अर्धा टीस्पून हळद
  • १ कप = १०० ग्रॅम्स ओला नारळ खवलेला
  • १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरलेला
  • १ मोठा टोमॅटो = ८५ ग्रॅम्स , मोठे तुकडे करून
  • २ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
  • अर्धा इंच आल्याचा तुकडा
  • १०-१२ लसणीच्या पाकळ्या
  • २ टीस्पून बडीशेप
  • १ टेबलस्पून धणे
  • ८-१० बेडगी सुक्या लाल मिरच्या
  • १ टीस्पून मोहरी
  • १०-१२ कढीपत्ता
  • ४-५ कोकम
  • पाव कप कोथिंबीर बारीक चिरलेली
  • तेल
  • मीठ
Instructions
कृती :
  1. सुरमईचे मध्यम ते मोठ्या आकारात तुकडे करून घ्यावेत , म्हणजे कालवणात ते जास्त शिजून पसरत नाहीत . डोक्याकडचा भाग , कडेचे भाग हे मांसल नसले तरी कालवणाला मस्त चव देतात .
  2. तुकड्यांना हळद आणि मीठ लावून १५ मिनिटे बाजूला ठेवावे , त्यामुळे माशाचा दर्प कमी होण्यास मदत होते .
  3. एका मिक्सरच्या भांड्यात सुक्या बेडगी मिरच्या , आले , लसूण , धणे , बडीशेप , कांदा , टोमॅटो , काश्मीरी मिरची पूड , खोबरे , आणि पाऊण कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
  4. एका कढईत ३-४ टेबलस्पून तेल गरम करावे . मोहरी व कढीपत्त्याची ची फोडणी करावी . वाटलेला मसाला घालावा , त्यासोबत थोडे कोथिंबीरीचे देठ चिरून घालावेत म्हणजे कालवणाला अप्रतिम चव येते . मसाला झाकून मंद आचेवर परतून घ्यावा म्हणजे मसाला कढईच्या बाहेर उडत नाही . मधेमधे ढवळत राहावा म्हणजे मसाला करपणार नाही .
  5. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे . साधारण ३ कप गरम पाणी घालून व चवीपुरते मीठ घालून कालवणाला मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी .
  6. नंतर मासे घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे . मंद आचेवर झाकण घालून शिजवावे . मासे नाजूक असतात म्हणून कालवणात सोडल्यावर त्यांना जोरजोराने चमच्याने ढवळू नये , तुटतात ! ४ मिनिटे शिजवल्यावर कोकम घालावीत , थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि झाकण काढून २ मिनिटे शिजवावेत .
  7. सुरमाईचे कालवण तयार आहे , गॅस बंद करून झाकण घालावे . माशाचे कालवण अगदी गरम असताना वाढू नये , जरा वाफ गेली की मुरल्यावर वाढावे , चविष्ट लागते ! हे कालवण ज्वारीच्या/ नाचणीच्या / तांदळाच्या भाकरीसोबत आणि गरम भातासोबत वाढावे .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/surmai-curry-konkani-style/