चिकन हंडी- Chicken Handi recipe in Marathi- How to make Chicken Handi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: १ तास ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १ तास
कितीजणांना पुरेल : ४-५
साहित्य:
  • १ किलो चिकन ( मध्यम आकाराचे तुकडे करून )
  • २ मोठे कांदे , लांब चिरून = २५० ग्रॅम्स
  • २ मोठे टोमॅटोची प्युरी = २५० ग्रॅम्स
  • २०० ग्रॅम्स दही
  • तेल
  • मीठ
  • ३ तमालपत्र
  • २ टीस्पून जिरे
  • ४ हिरव्या वेलच्या
  • १ टीस्पून काळी मिरे
  • ३ मसाला वेलच्या
  • अर्धा टीस्पून लवंग
  • दीड इंच दालचिनीचा तुकडा
  • १ टेबलस्पून काश्मिरी मिरची पूड
  • अर्धा टीस्पून हळद
  • १ लिंबाचा रस
  • अर्धा टीस्पून कसूरी मेथी भाजून पावडर केलेली
  • २ टेबलस्पून धणे पावडर
  • २-३ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
  • पाव कप कोथिंबीर
Instructions
कृती:
  1. स्वच्छ धुतलेल्या चिकनच्या तुकड्यांना १ टीस्पून मीठ , अर्धा टीस्पून हळद , लिंबाचा रस चोळून लावावा. चिकन असेच झाकून अर्धा तास मुरत ठेवावे .
  2. खडे गरम मसाले भाजून घेऊ . एका तव्यात तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, काळी मिरे , मसाला वेलच्या , हिरव्या वेलच्या , जिरे आणि लवंग घालून मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत . थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पावडर करून घ्यावी .
  3. चिकनच्या दुसऱ्या मॅरिनेशनसाठी चिकनवर ही गरम मसाला पावडर, लाल मिरची पूड, धणे पावडर, आणि दही घालावे व नीट एकत्र करून घ्यावे. चिकन झाकून या मॅरिनेशनमध्ये १ तास फ्रिजमध्ये ठेवावे.
  4. १ तासानंतर चिकन बनवण्यास सुरुवात करू . एका मातीच्या हंडीत ४-५ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा घालावा. हा कांदा चांगले परतून घ्यावा .
  5. कांदा खरपूस परतला की त्यात आले लसणाची पेस्ट घालावी . तिचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यावी . थोडी कोथिंबीर घालावी आणि मॅरीनेट केलेले चिकन घालून मोठ्या आचेवर परतून घ्यावे .
  6. ५ मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी घालावी . चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
  7. दहा मिनिटांत एकदा चिकन वर खाली करून घ्यावे . आपण या रेसिपीत पाणी वरून घातले नाहो आहे , चिकनच्या अंगच्या पाण्यातच परत झाकण घालून ते शिजू द्यावे .
  8. पूर्ण २५ मिनिटांत चिकन शिजले आहे . जर रस्सा घट्ट हवा असेल तर झाकण काढून चिकन थोडा वेळ शिजवून जास्तीचे पाणी सुकू द्यावे . आता यात भाजलेली कसूरी मेथी पावडर घालून मिसळून घ्यावी . गॅस बंद करावा .
  9. एका बाजूला १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी करून घ्यावी . हे फोडणी चिकन रश्श्यात मिळसळावी , वरून कोथिंबीर घालावी . झाली चिकन हंडी तयार! फुलके , पोळ्या, नान, लच्छा परोठा किंवा वाफेवरच्या भातासोबत वाढावे .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8-%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80/