Dum Aloo recipe in Marathi- दम आलू- How to make restaurant style Dum Aloo- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Main
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ६० मिनिटे
कितीजणांना पुरेल : ४ ते ५
साहित्य:
१५-१८ = ४०० ग्रॅम्स बेबी पोटॅटो ( नाही मिळाले तर मोठे बटाटे ४ तुकडे करून घ्यावेत )
पाऊण कप = १८० ग्रॅम्स दही
३ टेबलस्पून फ्रेश क्रीम
मीठ चवीनुसार
पाऊण कप = १५० ग्रॅम्स टोमॅटो प्युरी
तेल
२ मोठे कांदे = २०० ग्रॅम्स लांब चिरून
१ इंच आल्याचा तुकडा
६-७ लसणाच्या पाकळ्या
५-६ बदाम
८-१० काजू
१ टीस्पून हळद
२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
१ टीस्पून भाजलेली जीरा पावडर
१ टेबलस्पून धणे पावडर
१ टीस्पून गरम मसाला पावडर
चुटकीभर वेलची पावडर
पाव टीस्पून साखर
अर्धा टीस्पून भाजलेली कसूरी मेथी पावडर
२ तमालपत्र
Instructions
कृती:
बटाटे स्वच्छ धुऊन साली काढून घ्याव्यात . बटाट्यांना काट्याने टोचे मारून घ्यावेत . एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. मंद ते मध्यम आचेवर बटाटे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत .
नंतर त्याच कढईत आले ,लसूण , कांदा घालून परतून घ्यावा . कांदा चांगला खरपूस परतून झाल्यावर काजू आणि बदाम देखील परतून घ्यावेत.
मसाला गॅसवरून उतरवून थंड करून घ्यावा . मग ३-४ टेबलस्पून पाणी घालून बारीक पेस्ट वाटून घ्यावी .
एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात तमालपत्र , आणि वाटलेला मसाला घालून ३-४ मिनिटे परतून घ्यावा . टोमॅटो प्युरी घालून एकत्र करून घ्यावी . आत हळद, लाल मिरची पूड , धणे पावडर , गरम मसाला पावडर , जिरे पावडर, साखर आणि चवीनुसार मीठ घालावे . मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
नंतर आच मंद करून किंवा गॅस बंद करून दही घालून घ्यावे . दही फेटलेले असावे . गॅस पेटवून मंद आचेवर दही मसाल्यात नीट एकत्र करून घ्यावे .
मसाला नीट परतून घेतल्यावर त्यात तळलेले बटाटे घालून घ्यावेत. आता दीड कप गरम पाणी घालावे , दम आलू ही घट्ट ग्रेव्ही असते म्हणून जास्त पाणी घालून पातळ करू नये .
\मध्यम आचेवर एक उकळी फुटल्यावर मंद आचेवर शिजू द्यावे .
मग त्यात वेलची पावडर, कसूरी मेथी ( हातानेच चुरून ) घालावी . दम आलू तयार आहेत ,आता क्रीम घालूरंगास बंद करावा .
क्रीमी , स्मूथ चमचमीत दम आलू तयार आहेत . पराठे , नान , पुरी किंवा जीरा भातासोबत वाढावेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/dum-aloo-recipe-in-marathi/