Chakli recipe in Marathi-भाजणीची चकली- How to make Bhajnichi Chakli- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Snack
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ:
बनवण्यासाठी वेळ:
किती बनतील:
साहित्य:
भाजणीचे साहित्य :
२ १/२ कप = ५०० ग्रॅम्स तांदूळ ( इंद्रायणी/ सुरती कोलम/ बासमती तुकडा ) शक्यतो जुना तांदूळ
२ १/४ कप = २५० ग्रॅम्स साबुदाणे
२ १/४ कप = २५० ग्रॅम्स चण्याची डाळ
अर्धा कप = १२५ ग्रॅम्स उडीद डाळ
अर्धा कप = १२५ ग्रॅम्स मूग डाळ
१//४ कप = ३० ग्रॅम्स जिरे
१/४ कप = २० ग्रॅम्स धणे
चकलीची उकड :
२ कप = २५० ग्रॅम्स चकलीचे भाजणी पीठ
२ कप= ५०० ml पाणी
१ टेबलस्पून पांढरे तीळ
अर्धा टीस्पून हळद
१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
१ टीस्पून मीठ किंवा चवीप्रमाणे
मोहन घालण्यासाठी व चकल्या तळण्यासाठी तेल
Instructions
कृती:
भाजणीची कृती :
सर्वप्रथम तांदूळ व डाळी वेगवेगळ्या स्वच्छ धुऊन चाळणीत निथळत ठेवाव्यात . पाणी पूर्ण निघून गेले कि एका स्वच्छ कोरड्या कापडावर पसरवून पंख्याखाली रात्रभर वाळवून घ्यावयात . रात्रभर शक्य नसेल तर ४-५ तास पुरेसे आहेत .
मग एका जाड बुडाच्या कढईत भाजणीचे सारे जिन्नस एका मागोमाग एक वेगवेगळे कडकडीत होईपर्यंत भाजून घ्यावेत . भाजताना आच मंदच ठेवावी . जिन्नसांचा रंग काळसर पडू देऊ नये किंवा मोठ्या आचेवर घाईने भाजून करपू देऊ नये .
सारे भाजलेले जिन्नस एका परातीत काढून नैसर्गिकरित्या थंड होऊ द्यावे . थंड व्हायला पंख्याखाली ठेवू नये .
थंड झालेली भाजणी चक्कीतून बारीक दळून आणावी , किंवा घरी मिक्सरमधून बारीक दळून चाळणीने चाळावी .
चकलीची उकड काढण्याची कृती:
भाजणीचे पीठ एका परातीत घ्यावे . त्यात १ टेबलस्पून कडकडीत गरम केलेल्या तेलाचे मोहन घालावे . झाऱ्याने किंवा चमच्याने पिठात नीट एकत्र करून घ्यावे. मग त्यात हळद, मिरची पूड, मीठ व तीळ घालून नीट एकत्र करावे .
एका खोलगट पातेल्यात २ कप पाणी उकळत ठेवावे ( २ कप पिठासाठी २ कप पाणी , १:१ प्रमाण ) पाणी उकळले की आच मंद करून त्यात भाजणीचे पीठ वैरावे . पलित्याच्या टोकाने नीट ढवळून पाण्यात एकत्र करावे . जसजसे पाणी पिठाने पूर्ण शोषून घेतले की गॅस बंद करावा आणि ही उकड किमान अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावी .
चकल्या पाडण्यासाठी :
अर्ध्या तासानंतर उकड हलके गरम असतानाच हाताने किंवा हाताला उष्णता सोसत नसल्यास तांब्याच्या बुडाने मळून घ्यावी . हाताला तेल वगैरे लावून मळू नये . नाहीतर चकल्या तेलात फसतात . पीठ व्यवस्थित घट्ट मळून त्याचा गोळा बनवून घ्यावा . याचे लहान आकाराचे ( सोऱ्यात बसतील एवद्या आकाराचे ) लंबगोल बनवून घ्यावेत .
एका बटर पेपरवर किंवा किचन वापराच्या प्लास्टिक शीट वर सोऱ्याने चकल्या पाडून घ्याव्यात . एकाच वेळी सगळ्या चकल्या पाडून घेऊ नयेत . नाहीतर तळेपर्यंत त्या कोरड्या पडतात .
चकल्या तळण्यासाठी :
कढईत मंद ते मध्यम आचेवर तेल तापवून घ्यावे . मोठ्या आचेवर तापवून तेलातून धूर निघेपर्यंत तेल तापू देऊ नये . तेल तापलेलं आहे हे पाहण्यासाठी त्यात पिठाचा एक लहान गोळा घालून पाहावा , जर तो तळून लगेच वर पृष्ठभागावर आला तर समजावे तेल तापले आहे .
चकल्या तेलात सोडताना झाऱ्यावर घेऊन अलगद कडेने तेलात सोडाव्यात , आच मध्यमच ठेवावी . लगेचच त्यांना हलवू नये . त्यांचा आकार तेलात जरा घट्ट झाला व त्या तरंगून वर आल्या कि त्यांना झाऱ्याने बाजू फिरवून घ्यावी . आच मंद करावी आणि त्यांना दोन्ही बाजूंनी एकाच रंगावर तळून घ्यावे . जसे तेलाचे बुडबुडे थांबतील तसे समजावे की चकल्या आतपर्यंत शिजल्यात .
चकल्या तळताना घाई केली तर त्या काही वेळाने सांदळतात आणि कुरकुरीत होत नाहीत !
तळलेल्या चकल्या किचन टिश्यू पेपरवर काढून थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात ठेवल्या तर बरेच दिवस टिकतात .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chakli-recipe-in-marathi/