Aloo Paratha recipe in Marathi- आलू पराठा- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Breakfast
Cuisine: Indian
 
Ingredients
किती बनतील : ८ ते १०
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : ६० मिनिटे
साहित्य:
  • २ कप्स= ३०० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
  • पाव कप = ५० ग्रॅम्स मैदा
  • १ टीस्पून मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार
  • अर्धा किलो उकडलेले बटाटे
  • १ लहान कांदा = ७० ग्रॅम्स बारीक चिरलेला
  • अर्धा कप कोथिंबीर बारीक चिरलेली
  • ७-८ लसणीच्या पाकळ्या
  • ७-८ हिरव्या मिरच्या
  • २ इंच आल्याचा तुकडा
  • पाव टीस्पून हळद
  • अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
  • पाव टीस्पून गरम मसाला पावडर
  • दीड टीस्पून धणे पावडर
  • १ टीस्पून भाजलेली जिरे पावडर
  • अर्धा टीस्पून आमचूर पावडर
  • मीठ चवीप्रमाणे
Instructions
कृती:
  1. पराठ्यांसाठी पीठ मळण्यासाठी एका परातीत गव्हाचे पीठ , मैदा , मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . त्यात १ टेबलस्पून तेल घालून पिठात रगडून घ्यावे .
  2. १ कप पाणी थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यावे. कणिक फार घट्ट किंवा सैल मळू नये . हाताला तेल लावून पीठ व्यवस्थित लवचिक होईपर्यंत तिंबून घ्यावे .
  3. पिठाचा गोळा एका मलमलच्या किंवा सुती ओलसर कापडाने झाकून काही वेळ बाजूला ठेवावे . आता बटाट्याचे सारण बनवून घेऊ . हिरव्या मिरच्या , आले आणि लसूण मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे . वाटताना पाणी घालू नये .
  4. आता उकडलेले बटाटे किसून घ्यावेत . कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा . आता हळद घालून १-२ मिनिटे परतून घ्यावा . त्यात हिरवा मसाला घालून २-३ मिनिटे परतून घ्यावा, त्यातच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि तेलात परतावी म्हणजे सारणाला छान सुगंध येतो .
  5. नंतर लाल मिरची पूड , गरम मसाला पावडर , धणे पावडर , जिरे पावडर घालावे . मसाला परतताना तो करपू नये म्हणून १-२ टेबलस्पून पाणी घालून परतावे .
  6. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर चवीनुसार मीठ घालावे . मग त्यात किसलेले बटाटे , आमचूर पावडर, कोथिंबीर घालून एकत्र ढवळून घ्यावे . गॅस बंद करावा , आणि हे सारण पूर्ण थंड होऊ द्यावे .
  7. कणकेचे हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत . गोळ्याला पीठ लावून वाटीचा आकार द्यावा . त्यात बसेल एवढेच बटाट्याचे सारण भरून गोळ्याचे तोंड बंद करावे . या गोळ्याला पोळपाटावर हाताने हलकेच दाब देऊन चपटे करून सारण सगळीकडे पसरून घ्यावे . हलक्या हाताने पराठे जाडसर लाटून घ्यावेत .
  8. पराठे तव्यावर शेकताना दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजावेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/aloo-paratha-recipe-in-marathi/