Gavraan Chicken Rassa recipe in Marathi-गावरान चिकन रस्सा-गावरान चिकन सुकं- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Main
Cuisine: Indian
Ingredients
कितीजणांसाठी बनेल : ४ -५
तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ: १०० मिनिटे
साहित्य:
१२०० ग्रॅम्स गावठी कोंबडीचे चिकन, मध्यम आकाराचे तुकडे , साफ करून आणि स्वच्छ धुऊन
१ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स बारीक चिरून
१ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरून
२ टीस्पून हळद
साडेतीन टेबलस्पून लाल मिरची पूड ( २ टेबलस्पून काश्मिरी आणि दीड टेबलस्पून तिखट मिरची पूड )
मीठ चवीप्रमाणे
तेल
वाटणासाठी :
२ मोठे कांदे = २०० ग्रॅम्स
१ कप कोथिंबीर
१ टेबलस्पून पांढरे तीळ
१ टेबलस्पून जिरे
१५ -१६ लसूण पाकळ्या
दीड इंच आल्याचा तुकडा
दीड कप = १२५ ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
ताजा गरम मसाला वाटण्यासाठी :
पाव टीस्पून लवंग
१ तमालपत्र
अर्धा टीस्पून शाही जिरे
१ टीस्पून धणे
१ जावित्रीची पाकळी
पाव टीस्पून हिरव्या वेलच्या
पाव टीस्पून काळी मिरे
Instructions
कृती:
चिकनच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोळून ३० मिनिटे बाजूला ठेवावे.
ताजा गरम मसाला कुटण्यासाठी वर गरम मसाल्याच्या साहित्यात दिलेले सारे मसाले एकत्र एका तव्यात हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत . एका ताटलीत वेगळे काढून घ्यावेत .
आता वाटणासाठी एका पॅनमध्ये जिरे घालून १-२ मिनिटे खरपूस भाजून घ्यावे . नंतर तीळ घालून चांगले तडतडेपर्यंत खरपूस भाजावेत . नंतर सुके खोबरे अगदी करड्या रंगावर खरपूस भाजावे . हे सगळे एका ताटात काढून घ्यावे .
२ मोठे कांदे डायरेक्ट गॅसच्या जाळावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत . एका रोटी स्टॅन्ड वर ठेवून खरपूस भाजून घ्यावेत . पूर्ण थंड करून घ्यावेत . त्यांच्या साली काढून सुरीने ४ तुकडे करावेत आणि मिक्सरच्या भांड्यात घालावेत . कांदा चुकुन ही धुऊ नये , वाटल्यास कापडाने काळसर भाग पुसून घ्यावा . मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खोबरे , तीळ , जिरे ,आले लसूण , कोथिंबीर व पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
एका कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून करडा होईपर्यंत परतून घ्यावा . नंतर त्यात चिकनचे तुकडे घालून २-३ मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावेत . नंतर ५ कप गरम पाणी घालून आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे .
साधारण ३५ मिनिटे चिकन शिजवल्यावर , चिकनचे मांसल तुकडे सुक्क्यासाठी वेगळे काढून घ्यावेत आणि काही तुकडे रस्श्यातच राहू द्यावेत . त्यात दीड टेबलस्पून लाल मिरची पूड , २ टीस्पून गरम मसाला , आणि एक तृतीयांश भाग मसाल्याचे वाटण रश्श्यात घालावे . मीठ चवीप्रमाणे घालावे . मंद आचेवर ७-८ मिनिटे शिजू द्यावे . चिकन रस्सा तयार आहे , गॅस बंद करून झाकून ठेवावे .
चिकन सुक्क बनवण्यासाठी एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात लांब चिरलेला कांदा घालून साधारण गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यात उरलेली लाल मिरची पूड, उरलेला गरम मसाला पावडर , उरलेले वाटण आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर . घालून एकत्र करून घ्यावी . मसाला नीट मंद आचेवर शिजवून घ्यावा .
मसाला शिजला की त्यात चिकनचे तुकडे घालून एकत्र करावेत . त्यात दीड कप गरम पाणी घालावे . मंद आचेवर शिजु द्यावे.
७-८ मिनिटे शिजवल्यावर चवीप्रमाणे मीठ घालावे . गॅस बंद करावा , चिकन सुकं तयार आहे .
गावरान चिकन रस्सा आणि सुक्क भाकरी व भातासोबत वाढावे !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/gavraan-chicken-rassa-recipe/