Milk Cake recipe in Marathi- मिल्क केक- How to make Milk Cake- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
बनवण्यासाठी वेळ : २ तास २० मिनिटे
किती बनतो : ७५० ग्रॅम्स
साहित्य:
 • २ लिटर घट्ट सायीचे म्हशीचे दूध
 • पावणे दोन कप = 1¾th कप्स =३५० ग्रॅम्स साखर
 • २ टेबलस्पून तूप
 • पाव टीस्पून तुरटी पावडर किंवा २ टीस्पून लिंबाचा रस
Instructions
कृती:
 1. खलबत्त्यात तुरटीची पावडर कुटून फक्त पाव टीस्पून आपल्या रेसिपीसाठी बाजूला काढून घ्यावी.
 2. एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉन स्टिक कढईत दूध उकळत ठेवावे . एक उकळी आली की गॅस मंद करावा आणि अर्ध्या पर्यंत येईपर्यंत दूध तापवावे . मधून मधून ढवळत राहावे जेणेकरून दूध खाली लागणार नाही . दूध अर्ध्यापर्यंत यायला ४५ मिनिटे साधारण लागतात !
 3. आता तुरटीची पावडर घालावी व दुधात ढवळून घ्यावी . तुरटी घातल्यावर दूध फाटून दाणेदार व्हायला सुरवात होते . तब्ब्ल २० मिनिटांनंतर दूध अजून थोडे आटते . त्यात साखर बॅचेस मध्ये घालावी , एकदम घालू नये कारण साखरेला खूप पाणी सुटते आणि दूध आटवायला अजून वेळ लागू शकतो .
 4. आता अगदी लक्ष देऊन मंद आचेवर दूध ढवळत राहून ते आटवायचेय . अगदी दूध घट्ट होऊन दाणेदार व हलक्या बदामी रंगाचे दिसू लागेपर्यंत आटवायचेय . त्यात २ टेबलस्पून तूप घालावे म्हणजे मिल्क केक आतून मऊसूत बनतो . आपण दूध २ तास २० मिनिटे शिजवून आटवले आहे .
 5. मिल्क केक सेट करण्यासाठी मी एक ब्रेड लोफ टिन घेतलाय तुम्ही डब्यात किंवा पातेल्यातही सेट करू शकता .
 6. टीनला आतून तुपातच हात लावून घ्यावा . मिल्क केक चे मिश्रण त्यात ओतून हलके टीनला टॅप करून एकसंध करून घ्यावं. अलुमिनिम फॉईल ने किंवा घट्ट झाकणाने बंद करून एका जागी जिथे आपला हात लागणार नाही तिथे सेट करायला ठेवावे . मिश्रणाच्या उष्णतेमुळे ते अजून शिजते आणि केक ला एक छान करड्या रंगाची झाक येते , परंतु हे सर्वस्वी तुम्ही कोणत्या भांड्यात सेट करताय यावर अवलंबून आहे . म्हणून खोलगट भांड्याचा वापर करावा.
 7. सहा तासांनंतर मिल्क केक ताटात काढून वड्या पाडून घ्याव्यात . गार्निश करण्यासाठी वरून पिस्त्याचे काप घालावेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/milk-cake-recipe-in-marathi/