Upvas Kachori recipe in Marathi- उपवासाची पनीर कचोरी- Navratri fasting recipes- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snack
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : २० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
किती बनतील : १२ -१५
साहित्य:
  • १०० ग्रॅम्स पनीर
  • पाऊण कप = ९० ग्रॅम्स राजगिरा पीठ
  • पाऊण कप= ९० ग्रॅम्स शिंगाड्याचे पीठ
  • २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • १ टेबलस्पून मनुका बारीक कापून
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • सैंधव मीठ
  • तेल
Instructions
कृती:
  1. कचोरीच्या बाहेरील आवरणासाठी आपण पीठ मळून घेऊ. एका खोलगट भांड्यात राजगिऱ्याचे आणि शिंगाड्याचे पीठ एकत्र करून घ्यावे. त्यात सैंधव मीठ घालावे. १ टेबलस्पून हलके गरम तेल घालावे. पीठ मळण्यासाठी १ कप कोमट पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यावे . थोडा तेलाचा हात लावून १० मिनिटांसाठी झाकून ठेवावी .
  2. कचोरीचे सारण बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये पनीर कुस्करून किंवा किसून घ्यावे . त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या , कोथिंबीर, बारीक कापलेल्या मनुका घालाव्यात . सैंधव मीठ चवीपुरते घालावे . नीट एकत्र घ्यावे . सारण तयार आहे .
  3. पीठाचे छोटे गोळे बनवून त्याच्या खोलगट पाऱ्या करून घ्याव्यात . सारण भरून गोळे बंद करून घ्यावेत. अशाच प्रकारे साऱ्या कचोऱ्या बनवून घ्याव्यात .
  4. कचोऱ्या तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करावे . मंद आच करून कचोऱ्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात .
  5. इतक्या मापात १२-१५ कचोऱ्या बनतात . नारळाच्या चटणीसोबत खावयास द्याव्यात .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/upvas-kachori-recipe-in-marathi/