Raw Banana Cutlet recipe in Marathi-केळ्याचे कटलेट- कच्च्या केळ्याचे आणि पनीरचे कोफ्ते
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Snack
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिटे
किती बनतील: २० -२५
साहित्य:
३ कच्ची केळी ( ३०० ग्रॅम्स )
१८० ग्रॅम्स पनीर
१ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलेला
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ टेबलस्पून राजगिऱ्याचे पीठ / शिंगाड्याचे पीठ / वरईचे पीठ
१ टीस्पून सैंधव मीठ
तेल
Instructions
कृती:
केळ्यांना आपण सालीसकट उकडून घेणार आहोत . पहिल्या पद्धतीत आपण मायक्रोवेव्हमध्ये केळ उकडून घेण्यासाठी एका काचेच्या मायक्रोवेव्ह सेफ बाउल मध्ये केळ पूर्णपणे भिजवून ठेवायचेय . झाकण घालून बाउल ओव्हन मध्ये ठेवायचा आणि खाली दिलेली ओव्हन सेटीन्ग्स करावीत :
मोड : मायक्रो
पॉवर : हाय ( माझ्या ओव्हनची ९०० वॅट )
वेळ : ४ मिनिटे
स्टार्ट
दुसऱ्या पद्धतीत आपण केळी मोदकपात्रात गॅसच्या शेगडीवर उकडून घेणार आहोत . मोदकपात्रात पाणी उकळून त्यावर चाळणीत केळ्यांचे दोन किंवा ३ तुकडे करून १०-१२ मिनिटे झाकून उकडून घ्यावीत. उकडल्यानंतर केळी पूर्ण थंड झाल्यावरच सोलावीत .
एका बाऊलमध्ये सोलली केळी घेऊन ती व्यवस्थित हाताने किंवा पोटॅटो मॅशरने कुस्करावेत . गुठळ्या राहू देऊ नयेत . मग त्यात पनीर कुस्करून एकत्र करावे .
आता या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, आले ,दाण्याचा कूट , चवीप्रमाणे सैंधव मीठ घालावे. आता यात राजगिऱ्याचे पीठ घालावे म्हणजे मिश्रणात व्यवस्थित बाईंडिंग येते . मिश्रणाचा गोळा बनवून घ्यावा .
या मिश्रणाचे छोटे गोळे बनवून घ्यावे . हे कोफ्ते आपण तळून घेणार आहोत.
आता आपण टिक्की बनवून घेऊया ज्या आपण ओव्हनमध्ये ग्रिल करून घेणार आहोत . तुम्ही तव्यावर किंवा ग्रिल पॅन वर शॅलो फ्राय करून घेऊ शकता !
मायक्रोवेव्ह सेफ तव्यात थोडे तेल लावून त्यावर टिक्की ठेवाव्यात . हाय रॅकवर ठेवून ओव्हनमध्ये ग्रिल कराव्यात .
मोड : ग्रिल
वेळ : १० मिनिटे
स्टार्ट
१० मिनिटांनंतर दुसऱ्या बाजूंनी ४ मिनिटे ग्रिल करून घ्यावीत .
कोफ्ते तळण्यासाठी कदाचीत तेल चांगले तापले की आच मंद करून कोफ्ते तळून घ्यावेत . तेल फार गरम असेल आणि मोठ्या आचेवर कोफ्ते तळले तर ते मागेच करपतात आणि थंड तेलात तळले तर ते फुटून पसरतात . सोनेरी रंगावर कोफ्ते तळून घ्यावेत .
कोफ्ते आणि टिक्की नारळाच्या चटणीसोबत किंवा कोथिंबीर चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत चविष्ट लागतात !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/raw-banana-cutlet-recipe-marathi/