Instant Rava Appe recipe in Marathi- इन्स्टंट रवा आप्पे- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
किती बनतील : २८ - ३०
साहित्य:
 • १ कप = २०० ग्रॅम्स रवा ( गव्हाचा )
 • २ कप = ४०० ml ताक
 • १ लहानकांदा = ६० ग्रॅम्स बारीक चिरलेला
 • पाव कप = ६० ग्रॅम्स मटारचे दाणे ( फ्रोझन किंवा ताजे )
 • पाव कप = ६० ग्रॅम्स किसलेले गाजर
 • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ताजे खोबरे
 • १ हिरवी मिरची बारीक चिरून
 • अर्धा टीस्पून मोहरी
 • ५-६ कढीपत्ता बारीक चिरून
 • पाव टीस्पून हिंग
 • अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा
 • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
 • १ टीस्पून मीठ
 • तेल
Instructions
कृती:
 1. रव्याला हलके भाजून घ्यावे . आप्प्यांचे मिश्रण बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात रवा घालावा .त्यात खोबरे, कोथिंबीर , आणि ताक घालून चांगले ढवळून घ्यावे . गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत .
 2. फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात मोहरी हिंगाची फोडणी करून कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात . नंतर कांडा घालून मऊ होईपर्यंत परतावा .
 3. कांदा मऊ झाला की त्यात किसलेले गाजर , मटारचे दाणे घालून शिजवून घ्यावेत . २ मिनिटांत भाज्या जरा शिजल्या की त्या आप्प्यांच्या मिश्रणात मिसळून घ्याव्यात . आता खाण्याचा सोडा , आणि मीठ घालून एकत्र करून घ्यावे . हे मिश्रण झाकून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवावे.
 4. दहा मिनिटांनंतर मोठ्या आचेवर आप्पे पात्र गरम करून घ्यावे . पात्रात अगदी थोडे तेल घालून घ्यावे . आच मंद करावी आणि साच्यांत आप्प्यांचे मिश्रण चमच्याने घालावे . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
 5. ४ मिनिटांनी झाकण काढून आप्पे पलटून दुसऱ्या बाजूने ही कुरकुरीत शॅलो फ्राय करून घ्यावेत .
 6. गरम गरम आप्पे नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत ही खायला देऊ शकता !
टीप:
 1. रवा भाजून घेतल्यामुळे तो चांगला फुलतो आणि आप्पे सुद्धा कुरकुरीत बनतात .
 2. बाजारातून रवा विकत आणल्यानंतर तो भाजून एका हवाबंद डब्यात भरावा म्हणजे त्याला खवटपणा येत नाही आणि त्यात आल्या किंवा टोके पडत नाहीत !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/instant-rava-appe-recipe-marathi/