Surmai Tawa Fry recipe in Marathi- सुरमई तवा फ्राय- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Starter
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ : ४० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
साहित्य:
१० ताज्या सुरमईचे तुकडे
१ लिंबाचा रस
१ टीस्पून हळद
अर्धा टीस्पून मीठ
१ मध्यम आकाराचा कांदा
१ टेबलस्पून बेडगी मिरची पावडर
१ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
दीड टीस्पून जिरे
१ टीस्पून काळी मिरे
१०-१२ कढीपत्ता
१ टेबलस्पून धणे
मीठ
तेल
Instructions
कृती:
सुरमईचे तुकडे स्वच्छ धुऊन एका कापडाने जास्तीचे पाणी टिपून घ्यावे. एका बाऊलमध्ये हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र करून घ्यावे. सुरमईच्या तुकड्यांना हे मिश्रण लावून १० मिनिटे मुरत ठेवावे.
तोपर्यंत वाटण वाटून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे,आले लसणाची पेस्ट , काळी मिरी , लाल मिरची पूड, धणे पावडर , जिरे , कढीपत्ता, आणि मीठ घालून थोडे पाणी घालुन घट्ट पेस्ट वाटून घ्यावी . फार पातळ करू नये नाहीतर माशांवर लावता येणार नाही.
ही पेस्ट माशांवर दोन्ही बाजूंनी लावून ३० ते ४५ मिनिटे मासे फ्रिजमध्ये ठेवावेत . म्हणजे मासे तळताना मसाला नीट चिकटून राहतो , तेलात पसरत नाही . व मासे हाताळायला सोप्पे जातात .
३० ते ४५ मिनिटांनंतर एका पसरट तव्यात ३ टेबलस्पून तेल घालून गरम करावे . आच मंद करून मासे तळून घ्यावेत. एका बाजूने ४-५ मिनिटे तळल्यानंतर मासे पलटून दुसऱ्या बाजूनेही मंद आचेवर तळून घ्यावे .
हे मासे भाकरीसोबत , भातासोबत तर उत्तमच लागतात परंतु स्टार्टर म्हणून तुमच्या पार्टीत बनवू शकता !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/surmai-tawa-fry-recipe-marathi/