Maharashtrian Pithla recipe in Marathi-महाराष्ट्रीयन पिठलं- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ३५ मिनिटे
कितीजणांना पुरेल : ३- ४
साहित्य:
  • १ कप = १०० ग्रॅम्स बेसन
  • २ मोठे कांदे= २२५ ग्रॅम्स , पातळ लांब चिरून
  • ८-१० लसणीच्या पाकळ्या
  • २ टेबलस्पून जिरे
  • दीड टीस्पून हळद
  • ५-६ कढीपत्ता
  • ६-७ हिरव्या मिरच्या
  • अर्धा कप कोथिंबीर
  • पाव कप किसलेले ओले खोबरे
  • २ टेबलस्पून शेंगदाणे भाजून , साली काढून
  • मीठ चवीनुसार
  • तेल
Instructions
कृती:
  1. पिठल्यासाठी वाटण बनवून घेऊ. हिरव्या मिरच्या , शेंगदाणे, जिरे , लसूण , खबरे आणि कोथिंबीर व पाऊण कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
  2. एका बाऊलमध्ये बेसन, हळद आणि थोडे थोडे पाणी घालून बेसनाचे गुठळ्या न होऊ देता पातळ मिश्रण करून घ्यावे. मी दीड कप पाणी वापरले आहे.
  3. एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कढीपत्ता , कांदा घालून परतून घ्यावा. कांदा चांगला तांबूस झाला की त्यात वाटण घालून घ्यावे. १ कप पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून वाटणात मिसळावे. मंद आचेवर झाकण घालून शिजवावे.
  4. वाटण चांगले शिजले की त्यात बेसनाचे मिश्रण हळूहळू घालून ढवळावे. नीट एकत्र झाले की त्यात साधारण साडेतीन कप पाणी घालून ढवळून घ्यावे. अजून पातळ हवे असल्यास पाणी घालू शकता . चवीनुसार मीठ घालावे.
  5. मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी. उकळी आली की आच मंद करून पिठले झाकण घालून शिजू द्यावे. मधून मधून ढवळत राहावे
  6. साधारण १२ मिनिटे पिठले आपण शिजू दिले आहे .
  7. गरम गरम पिठले . भातासोबत किंवा भाकरीसोबत वाढावे.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/maharashtrian-pithla-marathi/