Lasun Khobra Chutney recipe in Marathi- लसूण खोबरा चटणी- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Accopaniment
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: १० मिनिटे
साहित्य :
  • १०० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
  • १५ लसणीच्या पाकळ्या
  • १० बेडगी लाल सुक्या मिरच्या ( रंगासाठी )
  • ५ लवंगी लाल सुक्या मिरच्या ( तिखटपणासाठी , जर लवंगी मिरच्या नाही मिळाल्या तर कुठलीही तिखट मिरची वापरली तरी चालेल )
  • मीठ चवीप्रमाणे
Instructions
कृती :
  1. दोन्ही प्रकारच्या सुक्या लाल मिरच्या देठे काढून मीठ घालून एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या.
  2. मिरच्यांची जरा बारीक पूड झाली कि त्यात लसूण आणि सुके खोबरे घालून परत एकदा मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या. या वाटणात अजिबात पाणी घालायचे नाही, कोरडेच वाटावे.
  3. लसूण खबऱ्याची चटणी तयार आहे .
  4. ही चटणी वडे, भजी आणि भाकरीसोबत खूपच छान लागते !
  5. ही चटणी एका हवाबंद डब्यात किंवा बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवावी . खूप दिवस टिकते
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/lasun-khobra-chutney-in-marathi/