Maharashtrian Amti recipe in Marathi- महाराष्ट्रीयन आमटी- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Main
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ :३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ: ४५ मिनिटे
कितीजणांना पुरेल : ४ ते ५
साहित्य:
अर्धा कप = १२५ ग्रॅम्स तूर डाळ
अर्धा कप = १२५ ग्रॅम्स मूग डाळ
२ लहान कांदे. उभे पातळ चिरून ( ८० ग्रॅम्स )
अर्धा कप किसलेले सुके खोबरे ५० ग्रॅम्स )
१ मोठा टोमॅटो , छोट्या तुकड्यांत शिरून ( १०० ग्रॅम्स )
मीठ चवीनुसार
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून मोहरी
अर्धा टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता
१ टीस्पून हळद
२ टेबलस्पून मालवणी मसाला
२ कोकम
७-८ लसणीच्या पाकळ्या
तेल
Instructions
कृती:
दोन्ही डाळी स्वच्छ धुऊन किमान अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवाव्यात .जेणेकरून त्या पटकन शिजतात व वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होते!
अर्ध्या तासाने पाणी काढून डाळी प्रेशर कूकरमध्ये घालून त्यात हळद, चुटकीभर हिंग, आणि टोमॅटो घालावा. डाळ बुडेल इतपतच पाणी कूकरमध्ये घालावे. मध्यम आचेवर प्रेशर कूकरमध्ये ३ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यावे.
कुकर मध्ये शिट्ट्या आल्यावर कुकर पूर्ण थंड झाल्याशीवायुघडु नये . तोपर्यंत आमटीसाठी वाटण बनवून घ्यावे. - एका पॅनमध्ये सुके खोबरे चांगले खरपूस भाजून घ्यावे .ताटलीत काढून घ्यावे.
आता त्याच पॅनमध्ये १-२ टेबलस्पून तेल तापवून घ्यावे. लसूण जरा गुलाबी रंगावर परतली की त्यात चिरलेला कांदा घालून खरपूस करड्या रंगावर परतून घ्यावा. अर्धी कोथिंबीर घालून तेलात जरा परतू द्यावी , थोडी कोथिंबीर आमटीच्या फोडणीत वापरणयासाठी बाजूला ठेवावी. भाजलेले खोबरे घालून हे वाटणाचे मिश्रण नीट तेलात एकत्र करून घ्यावे. गॅस बंद करून हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
एका कढईत ३ टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी, कढीपत्ता , हिंग , उरलेली कोथिंबीर , मालवणी मसाला , आणि वाटण हे सगळे क्रमाने घालून चांगले परतून घ्यावे. मसाला करपू देऊ नये , म्हणून जर कोरडा पडत आला तर त्यात थोडे पाणी घालून परतून घ्यावा. थोडे मीठ घालावे. कढईच्या कडेने तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घ्यावा.
आता शिजलेली डाळ आणि जितकी घट्ट किंवा पातळ आमटी हवी असेल त्याप्रमाणे पाणी घालून घ्यावे ( मी ३ १/२ कप पाणी वापरले आहे ) . चवीप्रमाणे मीठ घालावे आणि मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी .
यात कोकमाचे तुकडे हातानेच बारीक पिंजून घालावेत आणि आच मंद करून झाकण घालून ५ ते ७ मिनिटे शिजू द्यावी.
ही तिखट , आंबट आमटी गरम असतानाच भातासोबत वरून तूप घालून वाढावी . सोबत निखार्यांवर भाजलेला पापड किंवा एखादी तळणीची मिरची सोबत असल्यास काय आनंद वर्णावा !
टीप: लसूण कांदा खोबऱ्याचे वाटण हे बऱ्याच कोकणी आमट्या , रस्सा , कालवणात वापरला जातो. वाटण बनवताना लसूण , कांदा आणि खोबरे जितके चांगल्या रीतीने भाजले गेले असेल त्यावर पदार्थाची चव अवलंबून असते .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/maharashtrian-amti-recipe-marathi/