Tandalachi Kheer recipe in Marathi-तांदळाची खीर- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
  • तयारीसाठी वेळ : ४० मिनिटे
  • शिजवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
  • कितीजणांसाठी पुरेल : ४ ते ५
  • साहित्य:
  • १ लिटर घट्ट सायीचे दूध ( फुल्ल क्रीम दूध / म्हशीचे )
  • अर्धा कप = १२५ ग्रॅम्स बारीक दाण्याचा तांदूळ ( आंबेमोहोर, किंवा इंद्रायणी किंवा बासमती तुकडा )
  • पाऊण कप = १८० ग्रॅम्स साखर ( अधिक गोड आवडत असल्यास साखर थोडी वाढवली तरी चालेल )
  • १ टेबलस्पून मनुका
  • १ टेबलस्पून काजूचे तुकडे
  • २ टेबलस्पून चारोळी
  • अर्धा टीस्पून वेलची पावडर
  • पाव टीस्पून जायफळ
  • तूप
Instructions
  1. कृती:
  2. तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन एका चाळणीत किमान ३० मिनिटे निथळत ठेवावेत. नंतर पाणी निघून गेले की मिक्सरमधून फक्त १० सेकंद फिरवून त्याची जाडसर पावडर करून घ्यावी . खलबत्त्यात किंवा पाट्यावर रवाळ वाटले तर उत्तमच!
  3. एका मोठ्या जाड बुडाच्या कढईत १ लिटर दूध तापवत ठेवावे. दुधाला उकळी आली की आच मंद करावी , आणि एकदा तळापासून दूध ढवळून घ्यावे . आता वाटलेले तांदूळ घालून लगेचच ढवळावे म्हणजे तांदळाच्या गुठळ्या पडणार नाहीत!. मंद आचेवर तांदूळ दुधात शिजवून घ्यावेत . मधून मधून दूध ढवळत राहावे आणि कढईच्या कडांना लागलेली साय दुधात घालावी म्हणजे खीर चांगली दाट होते .
  4. खीर शिजतेय तोवर बाजूला एका छोट्या पॅनमध्ये १-२ टेबलस्पून तूप गरम करावे. त्यात चारोळ्या , काजू आणि मनुका एकामागोमाग एक परतून घ्याव्यात . चारोळ्या आणि काजू खरपूस होई पर्यंत आणि मनुका फुलेपर्यंत परताव्यात , खूपच स्वादिष्ट लागतात!
  5. साधारण १२ मिनिटांत खीर चांगली दाट होते , आता त्यात साखर घालून ढवळून घेऊ. साखर घातल्यावर थोडे पाणी सुटते . ते आठवायला अजून अजून ७-८ मिनिटे खीर मंद आचेवर शिजवून घेऊ .
  6. आता सरतेशेवटी तुपात परतलेला सुका मेवा , वेलची पावडर , व जायफळ पावडर घालून नीट ढवळून घेऊ. खीर तयार आहे . गॅस बंद करून झाकण घालून ठेवू . ही खीर हलकी गरम असताना किंवा फ्रिजमध्ये थंड करून सुद्धा खायला खूप छान लागते .
  7. गौरी गणपतीच्या नैवेद्यात घारग्यांसोबत किंवा पुऱ्यांसोबत ही खीर म्हणजे आनंदाची पर्वणीच!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/tandalachi-kheer-recipe-marathi/