Ghosalyachi Bhaji Recipe In Marathi - घोसाळ्याची भजी - गिलक्यांची भजी- Sponge Gourd Fritters - KaliMirchBySmita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Appetizer
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
साहित्य :
२ घोसाळे ( २५० ग्रॅम्स )
८ हिरव्या मिरच्या
पाव कप कोथिंबीर
१ कप १२५ ग्रॅम्स बेसन
तेल
पाणी गरजेनुसार
१ टीस्पून जिरे
१ टीस्पून पांढरे तीळ
१ टेबलस्पून रवा
मीठ चवीनुसार
Instructions
कृती:
घोसाळी स्वच्छ धुऊन त्यांच्या पातळ गोल चकत्या कापून घ्याव्यात . मी थोडे तिरके कापून त्यांना लांबट कापते , दिसायला छान दिसतात !
चिरल्यानांतर लगेचच त्यांना थंड पाण्यात बुडवून ठेवावे , म्हणजे काळे पडत नाहीत.
आता हिरवा मसाला वाटण्यासाठी , एका मिक्सरच्या भांड्यात जिरे, हिरव्या मिरच्या, आणि कोथिंबीर पाणी न घालता घट्ट गोळा वाटून घेऊ.
आता बेसन मंद आचेवर भाजून घेऊ म्हणजे त्याला अजून खमंगपणा येईल. बेसनाचा रंग बदलू द्यायचा नाहीये , फक्त एकच मिनिट भाजून घ्यायचे आहे.
एका मोठ्या बाऊलमध्ये हे भाजलेले बेसन घालून त्यात रवा , वाटलेला हिरवा मसाला , चवीपुरते मीठ आणि ३ टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून नीट एकत्र करून घ्यावे. गरजेनुसर पाणी घालून भज्यांचे पीठ सरसरीत करून घ्यावे. बेसनाचे मिश्रण चांगले हलके होईपर्यंत फेटावे . जितके फेटले जाईल तितक्या भजी हलक्या बनतील! हे मिश्रण फार पातळ नसावे . मी पाऊण कप पाणी वापरले आहे . मिश्रण झाकून थोडे १० -१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
भजी तळण्यासाठी मध्यम आचेवर कढाईत तेल तापवून घ्यावे. तेल चांगले तापले की आच मंद ते मध्यम ठेवावी आणि मगच घोसाळ्यांच्या तुकडयांना बेसनात घोळवून तेलात अलगद सोडावे. दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यावेत.
या गरमागरम भजी लाल मिरचीच्या ओल्या ठेच्यासोबत खूपच चविष्ट लागतात! नक्की करून पहा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/ghosalyachi-bhaji-recipe-in-marathi/