Panchmeva Paag recipe in Marathi - पंचमेवा मावा पाग - Dry Fruit Paag with Mawa - Janmashtami Paag
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
साहित्य:
  • १ कप = २० ग्रॅम्स मखाना
  • १ कप = ८० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
  • पाव कप = ५० ग्रॅम्स बदाम
  • पाव कप = ५० ग्रॅम्स काजू
  • पाव कप = ५० ग्रॅम्स मगज बीज
  • पाव कप = ५० ग्रॅम्स डिंक / गोंद
  • अर्धा कप = १२५ ग्रॅम्स खवा/ मावा
  • २ कप्स = ४०० ग्रॅम्स साखर
  • अर्धा टीस्पून वेलची पावडर - जाडसर करुन
  • तूप गरजेनुसार
Instructions
कृती :
  1. एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे. त्यात मखाना ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यावेत.
  2. परत १ टेबलस्पून तूप घालून काजू, बदाम , मगज बिया वेगवेगळे प्रत्येकी २-३ मिनिटे खरपूस भाजून घ्यावेत
  3. डिंक तळण्यासाठी पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप घालून मंद आचेवर डिंक नीट फुलवून घ्यावा . डिंक मोठ्या आचेवर तळला तर बाहेरून लवकर करडा होऊन आत कच्चा राहतो .
  4. डिंक तळून झाला की त्याच पॅनमध्ये उरलेलया तुपातच खोबरे भाजून फक्त चुरचुरीत होईपर्यंत भाजावे.
  5. नंतर त्याच पॅनमध्ये खवा फक्त २-३ मिनिटे भाजावा. जास्त कोरडा होऊ देऊ नये .
  6. आता मखाना , बदाम, काजू, डिंक मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यावे . खलबत्त्यात कुटले तरी चालेल .
  7. साखरेच्या पाकासाठी २ कप साखर एका कढईत घालून त्यात १ कप पाणी घालावे. मंद आचेवर साखर वितळू द्यावी. अजून १२ ते १५ मिनिटे मंद आचेवर शिजवून साखरेचा एकतारी पाक बनवावा !
  8. पाक शिजत आला की त्यात कुटलेला मेवा , खोबरे ,खवा आणि वेलची पावडर घालून नीट एकत्र करून घ्यावा. ३-४ मिनिटे मंद आचेवर पाक पूर्ण मुरेपर्यंत शिजवून घ्यावे.
  9. गॅस बंद करून हे मिश्रण एका थाळीला तुपाचा हात लावून त्यावर चौकोनाकृती थापून घ्यावे .
  10. अर्धा तास थंड झाल्यावर आपल्याला हवे तसे वड्यांचे आकार पडून घ्यावेत . अजून २ तास पूर्ण थंड होऊ द्यावेत ..
  11. एका हवाबंद डब्यात ठेवून या वड्या ५-६ दिवस तरी बाहेर चांगल्या राहतात !
कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/panchmeva-paag-recipe-in-marathi/