How to make Spring Dosa in Marathi - Schezwan dosa recipe in Marathi - Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
 
Ingredients
किती बनतील : ६ ते ८
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
साहित्य :
 • डोशाचे पीठ भिजवण्यासाठी :
 • पाऊण कप इडलीचा तांदूळ ( उकडा तांदूळ )
 • पाव कप नेहमीच्या वापरातला भाताचा तांदूळ
 • पाव कप उडीद डाळ
 • अर्धा टीस्पून मेथीचे दाणे
 • डोशाच्या स्टफींग साठी:
 • १ कप शिजवलेले नूडल्स ( ४० ग्रॅम्स कच्चे नूडल्स शिजवून )
 • १ मध्यम आकाराची भोपळी मिरची = ७० ग्रॅम्स , लांब पातळ चिरून
 • पाऊण कप = ७५ ग्रॅम्स कोबी , लांब चिरून
 • पाऊण कप = ७० ग्रॅम्स पातीचा कांदा लांब चिरून ( पात्या बारीक चिरून घ्याव्यात )
 • अर्धा कप = ५० ग्रॅम्स गाजर लांब चिरून
 • १ मध्यम आकाराचा कांदा = ७० ग्रॅम्स लांब चिरून
 • अर्धा टीस्पून काळी मिरी जाडसर कुटून
 • १ टेबलस्पून रेड चिली सॉस
 • १ टेबलस्पून ग्रीन चिली सॉस
 • दीड टीस्पून सोया सॉस
 • १ टेबलस्पून शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस
 • २ टेबलस्पून टोमॅटो केचअप
 • २ टीस्पून व्हिनेगर
 • मीठ चवीनुसार
 • चीज
 • बटर
 • तेल
Instructions
कृती :
 1. डोशाचे पीठ बनवण्यासाठी पहिल्यांदा इडलीचा तांदूळ , उडीद डाळ आणि मेथी दाणे ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.
 2. तांदूळ आणि मेथीदाणे एकत्र पाण्यात भिजवून घ्यावेत. उडीद डाळ वेगळी भिजवून घ्यावी. किमान ६-७ तास भिजू द्यावे. त्यानंतर पाणी काढून घ्यावे. भिजवलेले तांदूळ व मेथीदाणे आणि उडीद डाळ वेगवेगळे बारीक वाटून घ्यावे. तांदूळ वाटण्यासाठी पाऊण कप आणि उडीद डाळीसाठी पाव कप पाणी वापरले आहे .
 3. एका खोलगट भांड्यात तांदळाची आणि उडीद डाळीची पेस्ट घालावी. १ टीस्पून मीठ घालून हाताने हे मिश्रण एकाच दिशेने गोल फिरवत ५-६ मिनिटे फेटून घ्यावे. असे केल्याने मिश्रण हलके होते . हे डोशाचे मिश्रण झाकून रात्रभर किंवा किमान ८ तास तरी एका उबदार जागी आंबवण्यास ठेवावे. मी ओव्हन २ मिनिटे हाय पॉवर वर गरम करून त्यात हे मिश्रण रात्रभर ठेवते . सकाळी छान आंबून फुलून येते .
 4. डोशाचे स्ट्फफिंग बनवण्यासाठी एका पॅनमध्ये २ टेबलस्पून बटर घालून वितळू द्यावे. कांदा घालून मऊ होईपर्यंत शिजू द्यावा. आता त्यात चिरलेल्या भाज्या घालाव्यात - भोपळी मिरची, कोबी, गाजर आणि हिरव्या पातीचा कांदा घालावा. थोडा पातीचा कांदा सजावटीसाठी राखून ठेवावा. मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतून घ्याव्यात .
 5. २-३ मिनिटांनंतर सॉसेस घालुयात - सोया सॉस, २ टीस्पून ग्रीन चिली सॉस, दीड टीस्पून रेड चिली सॉस , टोमॅटो केचअप , आणि २ टीस्पून शेजवान चटणी घालून नीट एकत्र करून घेऊ. २ मिनिटे शिजू देऊ.
 6. आता नूडल्स घालून एकत्र ढवळून घेऊ. नूडल्स कसे शिजवून घ्यावेत यासाठी व्हेज हक्का नूडल्स चा ब्लॉग नक्की वाचा. चवीनुसार मीठ , कुटलेली काळी मिरी पावडर, आणि व्हिनेगर घालून ढवळून घेऊ. गॅस बंद करू.
 7. डोसे बनवण्यासाठी मी पारंपारिक काईल म्हणजेच बिडाचा तवा वापरला आहे . तुम्ही नॉनस्टिक तवा देखील वापरू शकता. तव्यावर व्यवस्थित तेल लावूनघेऊ. तवा गरम झाला की आच मध्यम करून १-२ डाव भरून डोशाचे मिश्रण मधोमध घालून डावानेच गोलाकार पातळ पसरवून घेऊ. झाकण घालून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवून घेऊ.
 8. २ मिनिटानंतर झाकण काढून थोडे बटर व सॉसेस घालून डोशावर नीट पसरवून घेऊ. अजून थोडा वेळ डोसा चांगला कुरकुरीत होऊ देऊ. आता नूडल्सचे स्ट्फफिंग डोशाच्या मधोमध घालून नीट सपाट करून घेऊ. त्यावर किसलेले चीज , आणि थोडा पातीचा कांदा घालू . दोन घड्या घालून डोसा बंद करून तव्यावरून ताटलीत काढावा.
 9. हा गरमागरम व्हेज स्प्रिंग डोसा नारळाच्या चटणीसोबत किंवा शेजवान चटणीसोबत मिटक्या मारत खावा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/how-to-make-spring-dosa-in-marathi/