How to make Coconut Burfi in Marathi - नारळाच्या वड्या - नारळी बर्फी - KALIMIRCHBYSMITA
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : २४ तास
बनवण्यासाठ वेळ : १५ मिनिटे
साहित्य :
  • दीड कप = १५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
  • अर्धा कप = १२५ ग्रॅम्स साखर
  • ७५ ml ताजे क्रीम ( अमुल क्रीम किंवा दुधाची ताजी साय )
  • २ टेबलस्पून पिठीसाखर
  • पाव कप पिस्त्याची कुटून जाडसर पावडर ( किंवा बदाम काजू पावडर ) - नाही घातली तरी चालेल
  • चुटकीभर वेलची पावडर
  • तूप गरजेनुसार
  • खाण्याचा लाल रंग ( २-३ थेंब ) - आवडत असल्यास घालावा
Instructions
कृती :
गॅसवर शिजवण्यासाठी :
  1. एका नॉनस्टिक कढईत किसलेला नारळ, साखर आणि ताजे क्रीम म्हणजेच दुधाची मलई घालून नीट एकत्र करून घ्यावे. मंद आचेवर साखर विरघळू द्यावी.
  2. साधारण २ मिनिटांत साखर विरघळू लागते . अजून १०-१२ मिनिटे मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावे जोपर्यंत साखर पूर्णपणे खोबऱ्यात शोषली जात नाही ! मिश्रण कढईच्या तळाशी लागू नये म्हणून ढवळत राहावे.
  3. साधारण १२ मिनिटांत मिश्रण हळूहळू घट्ट होऊन कढईचा तळ सोडू लागतो . वेलची पावडर घालून घ्यावी. गॅस बंद करून मिश्रण २-३ मिनिटे जरा वाफ दवडून थंड होऊ द्यावे.
  4. २ मिनिटांनंतर पिठीसाखर घालून बर्फीच्या मिश्रणात नीट एक सारखी करून घ्यावी.
  5. एका ताटलीला तुपाचा हात लावून किंवा ट्रे मध्ये बटर पेपर पसरवून त्यावर तुपाचा हात लावून घ्यावा. बर्फीचे मिश्रण छान चौकोनी आकारात आपल्या हव्या तितक्या जाडीचे थापून घ्यावे.
  6. वरून थोडी वेलची पावडर भुरभुरावी आणि पिस्त्याची पावडर सुद्धा ! हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे .
मायक्रोवेव्हमध्ये शिजवण्यासाठी:
  1. एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये किसलेला नारळ, साखर आणि फ्रेश क्रीम घालावे. त्यातच २-३ थेंब खाण्याचा लाल रंग घालावा. नसेल आवडत तर रंग नाही घातला तरी चालेल ! नीट एकत्र करून घ्यावे .
  2. हा बाउल ओव्हन मध्ये ठेवून पुढील सेटीन्ग्स करावेत:
  3. मोड: मायक्रोवेव्ह
  4. पॊवर : ९०० वॅट ( हाय )
  5. वेळ : ४ मिनिटे
  6. स्टार्ट चे बटण दाबावे.
  7. ४ मिनीटांनंर्र बाउल बाहेर काढून एकदा मिश्रण वर खाली करून घ्यावे व अजून शिजवण्यासाठी खालील सेटीन्ग्स करावेत :
  8. मोड: मायक्रोवेव्ह
  9. पॊवर : ९०० वॅट ( हाय )
  10. वेळ : २ मिनिटे
  11. स्टार्ट चे बटण दाबावे.
  12. २ मिनिटांनंतर वेलची पावडर घालून ढवळून घ्यावे. आणि फक्त १ मिनिटासाठी वरीलप्रमाणेच सेटीन्ग्स ठेवून शिजवावे.
  13. केवळ ७ मिनिटांतच नारळाची बर्फी मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये तयार झाली . २-३ मिनिटांनी जरा थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळून घ्यावी . ट्रे मध्ये बटर पेपरवर थापून घ्यावी. वरून वेलची पावडर आणि पिस्ता पावडर भुरभुरावी!
  14. एका तासानंतर या बर्फीचे सुरीने तुकडे करून घ्यावेत परंतु तिला वेगळे करू नये . पूर्ण १ दिवस किंवा किमान ६-८ तास तरी ही बर्फी झाकून सेट होऊ द्यावी .
  15. दुसऱ्या दिवशी या मस्तपैकी घट्ट सेट होतात आणि अतिशय सोप्प्या रीतीने एकमेकांपासून वेगळ्या होतात !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/how-to-make-coconut-burfi/