Narali Bhat Recipe in Marathi - नारळी भात - Kali Mirch By Smita
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
कितीजणांना पुरेल: ३-४
साहित्य :
  • अर्धा कप = १२५ ग्रॅम्स सुवासाचा तांदूळ. आंबेमोहोर किंवा बासमती
  • अर्धा कप = १०० ग्रॅम्स गूळ बारीक चिरून
  • १ कप = १०० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
  • अर्धा कप = १२५ ml नारळाचे जाडसर दूध
  • अर्धा कप = १२५ ml पाणी
  • तूप गरजेनुसार
  • १ टेबलस्पून बदाम
  • १ टेबलस्पून काजू
  • १ टेबलस्पून मनुका
  • ३ हिरव्या वेलच्या
  • ३ लवंग
  • पाव टीस्पून मीठ
Instructions
कृती:
  1. तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन किमान ३० मिनिटे तरी पाण्यात भिजवून ठेवावेत . दाणे छान फुलून येतात . तोपर्यंत आपण सुक्या मेव्याचे बारीक तुकडे कापून घेऊ. बदामाचे उभे काप , काजू आणि मनुक्याचे बारीक तुकडे करावेत .
  2. एका कढईत १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात मंद आचेवर हा सुका मेवा मिनिटभर परतून घ्यावा. छान फुलून येतात आणि खायला अजून चविष्ट लागतात ! कढईतून बाजूला काढून घ्यावेत .
  3. त्याच कढईत अजून १ टेबलस्पून तूप घालून त्यात लवंगा, वेलच्या घालून परतून घ्यावयात . करपू देऊ नयेत . जरा फुलून आल्या की भिजवलेला तांदूळ वैरावा. १-२ मिनिटे तांदूळ तुपात मंद आचेवर परतून घ्यावा . प्रत्येक दाणा तुपात घोळला जातो आणि छान मोकळासुद्धा शिजतो .
  4. नंतर अर्धा कप पाणी व मीठ घालून एकत्र करून घ्यावे . आता अर्धा कप नारळाचे दूध घालावे . जर तुम्हाला नारळाचे दूध घालावयाचे नसेल तर , त्याऐवजी अजून अर्धा कप पाणी घालावे म्हणजे तांदूळ शिजवायला १ कप पाणी घालावे. मध्यम आचेवर हल्कीउकळी फुटू द्यावी . वाटल्यास थोड्या केशराच्या काड्या घालाव्यात ( नाही घातलेत तरी चालेल ) . नीट एकत्र करून घ्यावे. आच मंद करावी आणि झाकण घालून शिजू द्यावे .
  5. भात शिजतोय तोपर्यंत आपण नारळाचा चव आणि किसलेला गूळ एका मोठ्या भांड्यात एकत्र करून घ्यावा. सुका मेवा घालावा. गूळ बारीक चिरला तर पटकन विरघळतो म्हणून चांगला बारीक किसून किंवा चिरून घ्यावा.
  6. बारीक आगीवर भात ५- ६ मिनिटांत शिजतो. गॅसवरून उतरवून एका थाळीत पसरवून घ्यावा.
  7. त्याच कढईत १ टेबलस्पून तूप घालावे. नारळ आणि गुळाचे वर एकत्र केलेले मिश्रण कढईच्या तळाशी नीट पसरवून थर लावून घ्यावा. त्यावर भाताचा थर लावून सपाट करून घ्यावा. आच मंद ठेवून झाकण घालून हा भात नारळ गुळाच्या रसात चांगला मुरू द्यावा.
  8. २ मिनिटे शिजवल्यानंतर झाकण उघडून गूळ विरघळला आहे कि नाही हे पाहावे . गुळाच्या रसात जर भात जास्त शिजला तर पाकाने तो चिवट होऊ शकतो म्हणून गूळ पूर्ण विरघळेपर्यंतच नारळीभात शिजवावा . नारळी भात हा नेहमी मधुर मऊसूत तुपाळ खायला मस्त लागतो !
  9. आच मंदच ठेवावी . आणि झाकण घालून भात अजून २ मिनिटे मुरू द्यावा.
  10. दोन मिनिटांनंतर गूळ भातात चांगला मुरला की गॅस बंद करावा , आणि वाढेपर्यंत कढई झाकण घालूनच बंद ठेवावी!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/narali-bhat-recipe-in-marathi/