Veg Hakka Noodles recipe in Marathi- व्हेज हक्का नूडल्स- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Cuisine: Indo-Chinese
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
कितीजणांना पुरेल : ४ -५
साहित्य:
१५० ग्रॅम्स नूडल्स
१ मध्यम आकाराचा कांदा लांब चिरून ( ८० ग्रॅम्स )
१ भोपळी मिरची लांब पातळ चिरून ( जुलिअन कट ) ( ७० ग्रॅम्स )
१ गाजर लांब पातळ चिरून ( जुलिअन कट ) ( ६० ग्रॅम्स )
अर्धा कप कोबी लांब चिरून ( ५० ग्रॅम्स )
१ १/२ टीस्पून सोया सॉस
१ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर
२ टीस्पून व्हिनेगर
मॅग्गी सिजनिंग क्यूब ( किंवा अर्धा टीस्पून अजिनोमोटो किंवा एमएसजी )
तेल
मीठ चवीनुसार
Instructions
कृती :
बाजारात बरेच हक्का नूडल्स चे ब्रॅण्ड्स आहेत , तुम्ही कोणताही ब्रँड वापरला तरी चालेल , फक्त त्यामागे दिलेल्या कूकिंग इंस्ट्रक्शन्स प्रमाणे नूडल्स शिजवावेत . मी चिंग्ज ब्रँड वापरला आहे . हे १५० ग्रॅम्स चे पॅक आहे . ते शिजवण्यासाठी जवळजवळ १० कप पाणी म्हणजे अडीच लिटर पाणी एका मोठ्या कढईत उकळत ठेवावे. पाण्यात अर्धा टीस्पून मीठ घालावे . पाण्याला उकळी आली की त्यात नूडल्स न तोडता घालावेत . मध्यम ते मोठ्या आचेवर दीड मिनिटांत नूडल्स नरम होतात आणि पाण्यावर तरंगू लागतात . एका फोर्क च्या मदतीने ते हळुवारपणे सोडवून घ्यावेत आणि काही वेळ अजून शिजवावेत .
नूडलस कधीही पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवू नयेत . नेहमी ते " Al-Dente " होईपर्यंत म्हणजेच दाताखाली एक बाइट मिळेपर्यंतच शिजवावेत . अजून ३ मिनिटांत नूडल्स शिजतात . त्यांना एका चाळणीत काढून थंड पाण्याखाली धुऊन घ्यावेत जेणेकरून त्यांचा एक्सट्रा स्टार्च धुऊन निघेल . असे केल्याने ते चिकट राहत नाहीत . नूडल्स एका थाळीत पसरवून थंड होऊ द्यावेत .
नूडल्स थंड झाल्यावर त्यावर १ टीस्पून तेल घालून मिसळून घ्यावे. सोया सॉस घालून एकत्र करून घ्यावेत .
एका लोखंडी कढईत ३ टेबलस्पून तेल घालून मध्यम आचेवर गरम करून घ्यावे . आले लसणाची पेस्ट घालून तिचा कच्चे पणा जाईपर्यंत परतून घ्यावे.
चिरलेला कांदा घालून नरम होईपर्यंत परतावा. सगळ्या भाज्या घालून घ्याव्यात - भोपळी मिरची, गाजर, आणि कोबी. भाज्या परतूनच शिजवाव्यात . फार शिजेपर्यंत नाही तर त्यांत एक क्र्न्च असेपर्यंतच शिजवाव्यात .
आता मॅग्गी सिजनिंग क्युब कुस्करून घालावे , अर्धा टीस्पून मीठ आणि काळी मिरी पावडर घालून नीट एकत्र मिसळून घ्यावे.
आता शिजवलेले नूडल्स घालून दोन फोर्क्स च्या मदतीने भाज्यांसोबत एकत्र करून घ्यावेत .
व्हिनेगर घालून मिसळून घ्यावेत . गॅस बंद करावा .
व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत . टोमॅटो केचअप किंवा शेजवान चटणीसोबत गरमगरम वाढावेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/veg-hakka-noodles-in-marathi/