Veg Fried Rice recipe in Marathi- व्हेज फ्राईड राईस - Kali Mirch By Smita
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indo-Chinese
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : २० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
कितीजणांना पुरेल : ३-४
साहित्य :
 • १ १/२ कप = ३०० ग्रॅम्स लांब दाण्यांचा बासमती तांदूळ , स्वच्छ धुऊन , किमान ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवलेला
 • १/२ कप = ५० ग्रॅम्स कोबी लांब व पातळ चिरून
 • १ कप = ८० ग्रॅम्स भोपळी मिरची लांब चिरून
 • १/२ कप =५० ग्रॅम्स गाजर लांब चिरून
 • १/२ कप = ५० ग्रॅम्स पतीचा कांदा लांब चिरून
 • १/२ कप = २५ ग्रॅम्स कांद्याची हिरवी पात बारीक चिरून
 • दीड टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
 • दीड टीस्पून सोया सॉस
 • १ मॅग्गी सीजनिंग क्यूब ( मॅग्गी मॅजिक मसाला क्यूब )
 • १/२ टीस्पून काळी मिरी मिरी जाडसर कुटून
 • तेल
 • मीठ चवीनुसार
Instructions
कृती:
 1. सर्वप्रथम आपण भात शिजवून घेऊ. हा भात आपण "ऍबसॉरपशन" मेथड ने शिजवणार आहोत. म्हणून दीड कप तांदळासाठी आपण दुप्पट म्हणजेच ३ कप पाणी वापरू. एक भांड्यात तांदूळ आणि पाणी एकत्र घालून त्यातच २ टीस्पून मीठ घालून घेऊ. मोठ्या आचेवर एक उकळी फुटू देऊ .
 2. आच मंद करून झाकण घालून बारीक आगीवर भात पूर्णपणे शिजू देऊ. भात शिजला की गॅस बंद करून एका ताटात पसरवून थंड होऊ देऊ . शिजलेल्या भाताला हळुवार हाताने फोर्क ने पसरावावा नाहीतर दाणे तुटतात. त्यावर थोडे तेल ( १ टीस्पून ) घालावे जेणेकरून भाताची शिते एकमेकांना चिकटून त्याचा गोळा होणार नाही !.
 3. भात थंड झाला कि त्यावर सोया सॉस घालून एकत्र करून घेऊ.
 4. एका मोठ्या लोखंडी कढईत किंवा नॉन स्टिक कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करून घेऊ. त्यात आले लसणाची पेस्ट घालून १-२ मिनिटे परतून घेऊ. त्यात सगळ्या वर चिरलेल्या भाज्या घालून मोठ्या आचेवर २ मिनिटे शिजू देऊ .
 5. आता मॅग्गी सिजनिंग क्यूब, काळी मिरी पावडर घालून परतून घेऊ. भाज्या अति शिजू देऊ नयेत .
 6. गरज असल्यास मीठ घालावे . आता शिजलेला भात घालून नीट वर खाली भाज्यांसोबत एकत्र करून घ्यावा.
 7. व्हेज फ्राईड राईस तयार आहे . बारीक चिरलेल्या कांद्याच्या हिरव्या पातीने सजवावा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/veg-fried-rice-recipe-in-marathi/