Veg Fried Rice recipe in Marathi- व्हेज फ्राईड राईस - Kali Mirch By Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Main
Cuisine: Indo-Chinese
Ingredients
तयारीसाठी वेळ : २० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
कितीजणांना पुरेल : ३-४
साहित्य :
१ १/२ कप = ३०० ग्रॅम्स लांब दाण्यांचा बासमती तांदूळ , स्वच्छ धुऊन , किमान ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवलेला
१/२ कप = ५० ग्रॅम्स कोबी लांब व पातळ चिरून
१ कप = ८० ग्रॅम्स भोपळी मिरची लांब चिरून
१/२ कप =५० ग्रॅम्स गाजर लांब चिरून
१/२ कप = ५० ग्रॅम्स पतीचा कांदा लांब चिरून
१/२ कप = २५ ग्रॅम्स कांद्याची हिरवी पात बारीक चिरून
दीड टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
दीड टीस्पून सोया सॉस
१ मॅग्गी सीजनिंग क्यूब ( मॅग्गी मॅजिक मसाला क्यूब )
१/२ टीस्पून काळी मिरी मिरी जाडसर कुटून
तेल
मीठ चवीनुसार
Instructions
कृती:
सर्वप्रथम आपण भात शिजवून घेऊ. हा भात आपण "ऍबसॉरपशन" मेथड ने शिजवणार आहोत. म्हणून दीड कप तांदळासाठी आपण दुप्पट म्हणजेच ३ कप पाणी वापरू. एक भांड्यात तांदूळ आणि पाणी एकत्र घालून त्यातच २ टीस्पून मीठ घालून घेऊ. मोठ्या आचेवर एक उकळी फुटू देऊ .
आच मंद करून झाकण घालून बारीक आगीवर भात पूर्णपणे शिजू देऊ. भात शिजला की गॅस बंद करून एका ताटात पसरवून थंड होऊ देऊ . शिजलेल्या भाताला हळुवार हाताने फोर्क ने पसरावावा नाहीतर दाणे तुटतात. त्यावर थोडे तेल ( १ टीस्पून ) घालावे जेणेकरून भाताची शिते एकमेकांना चिकटून त्याचा गोळा होणार नाही !.
भात थंड झाला कि त्यावर सोया सॉस घालून एकत्र करून घेऊ.
एका मोठ्या लोखंडी कढईत किंवा नॉन स्टिक कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करून घेऊ. त्यात आले लसणाची पेस्ट घालून १-२ मिनिटे परतून घेऊ. त्यात सगळ्या वर चिरलेल्या भाज्या घालून मोठ्या आचेवर २ मिनिटे शिजू देऊ .
आता मॅग्गी सिजनिंग क्यूब, काळी मिरी पावडर घालून परतून घेऊ. भाज्या अति शिजू देऊ नयेत .
गरज असल्यास मीठ घालावे . आता शिजलेला भात घालून नीट वर खाली भाज्यांसोबत एकत्र करून घ्यावा.
व्हेज फ्राईड राईस तयार आहे . बारीक चिरलेल्या कांद्याच्या हिरव्या पातीने सजवावा !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/veg-fried-rice-recipe-in-marathi/