Paneer Tikka Sandwich recipe in Marathi-पनीर टिक्का सँडविच- Kali Mirch by Smita
Author: 
 
Ingredients
  • तयारीसाठी वेळ: २० मिनिटे
  • बनवण्यासाठी वेळ: २० मिनिटे
  • कितीजणांसाठी बनेल: ४ ते ५
  • साहित्य :
  • १ पॅकेट ब्रेड स्लाईसेस ( व्हाईट / ब्राउन )
  • २५० ग्रॅम्स पनीर , छोटे चौकोनी तुकडे कापून
  • १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स, बारीक चिरून
  • १ मध्यम आकाराची भोपळी मिरची = ७० ग्रॅम्स बारीक चौकोनी आकारांत चिरून
  • १/२ कप = ७५ ग्रॅम्स टांगलेले दही / चक्का/ हंग कर्ड ( १२५ ग्रॅम्स दह्याला मलमलच्या कपड्यात बांधून किमान अर्ध्या तासासाठी टांगून ठेवणे )
  • हिरवी चटणी
  • बटर
  • १ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
  • १/४ टीस्पून हळद
  • १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
  • १/२ टीस्पून धणे पावडर
  • १/२ टीस्पून गरम मसाला पावडर
  • १/२ टीस्पून चाट मसाला पावडर
  • २ टीस्पून तंदूरी मसाला पावडर
  • १ टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
Instructions
  1. कृती:
  2. पनीर साठी मॅरिनेड बनवून घेऊ. एका भांड्यात टांगलेले दही, आले लसणाची पेस्ट , हळद, काश्मिरी लाल मिरची पूड, धणे पावडर, गरम मसाला पूड, चाट मसाला , तंदूरी मसाला पावडर, आणि चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे. गुठळ्या राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  3. या मॅरिनेड मध्ये पनीरचे तुकडे, भोपळी मिरचीचे तुकडे, आणि चिरलेला कांदा घालून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
  4. १५ मिनिटांनंतर एका पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल घालून गरम करून घ्यावे. त्यात मॅरिनेटेड पनीर घालून मध्यम आचेवर १ मिनिट परतून घ्यावे. मंद आच करून झाकण घालून शिजू द्यावे. पनीर शिजल्यावर त्यातील जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी झाकण काढून थोडा वेळ शिजू द्यावे. अतिशय कोरडे होईपर्यंत थांबू नये नाहीतर ते सॅन्डविचमध्ये व्यवस्थित पसरत नाही. गॅस बंद करून हे पनीर चे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यावे.
  5. आता सँडविचेस बनवून घेऊ. एका ब्रेड स्लाईस ला बटर लावून घ्यावे. बटर त्यासाठी मऊ पाहिजे. सँडविच बनवण्याआधी किमान अर्धा तास आधी बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे. दुसऱ्या स्लाईसला हिरवी चटणी लावून घ्यावी. या दोन स्लाईसमध्ये पनीरचे मिश्रण घालून हलक्या हाताने दाबून घ्यावे. सँडविच खूप जास्त भरू नये . नाहीतर ग्रिल करताना तुटू शकते.
  6. सँडविच ग्रिल करण्यासाठी आपण ग्रिल पण किंवा नेहमीच्या वापराचा तवा किंवा टोस्टर देखील वापरू शकतो. गरम तव्यावर बटर घालून त्यावर सँडविच दोन्ही बाजूंनी छानपैकी ग्रिल करून घ्यावे. एक बाजू साधारण २ मिनिटे मंद आचेवर चांगली भाजून घ्यावी. मग दुसरी बाजू ग्रिल करून घ्यावी.
  7. तयार सँडविचेस आपल्याला हव्या त्या आकारात कापून सर्व करावेत. डब्यात भरताना अल्युमिनियम फॉईल मध्ये गुंडाळून ठेवावेत.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/paneer-tikka-sandwich-in-marathi/