Chutney Sandwich recipe in Marathi- चटणी सँडविच -Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Snack
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ: १० मिनिटे
कितीजणांसाठी बनेल: ४ ते ५
साहित्य:
१ कप पुदिन्याची पाने
१ कप ताजी निवडलेली कोथिंबीर
१/२ कप खवलेला ओला नारळ
१ टीस्पून जिरे भाजून , कुटून घ्यावी
१ लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
२ हिरव्या मिरच्या
ब्रेड स्लाईसेस
बटर
Instructions
कृती:
सर्वप्रथम चटणी वाटून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात , हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना , जिरे पावडर, मीठ , लिंबाचा रस आणि खोबरे घालून थोडे पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्यावी. चटणी घट्ट असावी , पातळ झाल्यास ती नीट पावाच्या स्लाईसेसवर लागत नाही. म्हणू मी फक्त १-२ टेबलस्पून पाणी वापरून घट्ट चटणी वाटून घेतली आहे.
ब्रेड स्लाईसेसच्या कडा कापून घेऊया. एका स्लाईस ला बटर लावून घेऊ. बटर त्यासाठी मऊ पाहिजे. सँडविच बनवण्याआधी किमान अर्धा तास आधी बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे. दुसऱ्या स्लाईसला चटणी लावून घ्यावी.
दोन्ही स्लाईसेस एकावर एक ठेवून सँडविच बंद करून घ्यावे. अशाच प्रकारे लागतील तेवढे सँडविच बनवून घ्यावेत.
मुलांच्या डब्यात भरताना सँडविच त्रिकोणी आकारांत कापून भरावेत आणि पार्टीसाठी सॅन्डविचचे छोटे चौकोनी फिंगर फूड प्रमाणे सर्व करावेत. आवडत असल्यास सोबत टोमॅटो केचअप द्यावे . लहान मुलांसाठी बनवताना मिरच्या कमी घालाव्यात.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/chutney-sandwich-recipe-marathi/