घेवड्याची भाजी- Ghevda Bhaji recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: १० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
कितीजणांना पुरेल: ३ ते ४
साहित्य:
 • २५० ग्रॅम्स घेवडा / वाल पापडी
 • १ मोठा कांदा लांब चिरून = ग्रॅम्स
 • १ टीस्पून ओवा
 • १/४ टीस्पून हिंग
 • ५-६ लसूण बारीक चिरून
 • १/२ टीस्पून हळद
 • १ टेबलस्पून मालवणी मसाला ( मालवणी मसाला नसेल तर २ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड + १ टीस्पून गरम मसाला पावडर वापरावी )
 • मीठ
 • १/२ कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
 • तेल
Instructions
कृती :
 1. घेवड्याच्या शेंगा सोलून , त्यांचे धागे काढून त्यांचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. भाजी स्वच्छ धुऊन एका चाळणीत निथळत ठेवावी.
 2. कढईत ३-४ टेबलस्पून तेल तापवून घ्यावे. ओवा आणि हिंगाची फोडणी करावी, त्यात लसूण घालून तो चांगला परतून घ्यावा.
 3. आता बारीक चिरलेला कांदा घालून ५-६ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावा. हळद आणि मालवणी मसाला घालावा . हे मसाले २ मिनिटे न करपवता परतून घ्यावे.
 4. साफ केलेला घेवडा घालून नीट एकत्र करून घ्यावा. मीठ चवीनुसार घालून ढवळून घ्यावे. अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर झाकण घालून शिजू द्यावे. फार जास्त पाणी घालू नये नाहीतर भाजी पचपचीत लागते.
 5. १० मिनिटे झाकून शिजवल्यावर घेवडा शिजतो आणि त्याचा नैसर्गिक crunch ही शाबूत राहतो. पाणी पूर्णपणे कोरडे झाले की ताजा खोवलेला नारळ घालून मिसळून घ्यावा. गॅस बंद करून भाजी गरम गरम वाढावी. फुलके चपातीसोबत ही भाजी डब्यासाठी उत्तम ! ओव्याच्या फोडणीने जो खमंगपणा भाजीला येतो त्याची चवच न्यारी ! वरण भाताबरोबर खूप भारी लागते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/ghevda-bhaji-recipe-in-marathi/