Ghavan recipe in Marathi- घावन- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Breakfast
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
किती बनतील : ८ ते १०
साहित्य:
  • १ कप = २०० ग्रॅम्स लहान दाण्यांचा तांदूळ
  • मीठ
  • तेल
  • पाणी गरजेनुसार
Instructions
कृती:
  1. घावन बनवण्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे . सुरती कोलम , बासमती तुकडा किंवा कोकणात हमखास मिळणारा आंबेमोहोर तांदूळ घेतला तरी चालतो. तांदूळ स्वच्छ पाण्याने चांगला धुऊन घ्यावा . मग तांदळाला कमीत कमी ६ तासांसाठी किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा . त्यानंतर त्याचे पाणी चाळणीत गाळून काढून टाकावे.
  2. हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यावी. खूप जास्त पाणी घालू नये . थोडे थोडे पाणी घालून फिरवून घ्यावे. पेस्ट रवाळ राहिली तर घावनाला तव्यावर भेगा पडतात . मी तांदळाची पेस्ट बनवण्यासाठी अर्धा कप पाणी वापरल आहे.
  3. आता या तांदळाचौ पेस्टमध्ये पाणी घालून आपल्याला ते पातळ करायचे आहे . मी अजून अडीच कप पाणी घालून घावनाचे मिश्रण पातळ केले आहे . म्हणजे तांदूळ वाटताना अर्धा कप आणि नंतर अडीच कप असे ३ कप पाणी वापरले आहे.
  4. आता चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे.
  5. लगेच घावन बनवायला सुरुवात करू , यांना तुम्ही झटपट होणारे डोसेही म्हणू शकता !
  6. एका नॉनस्टिक तव्याला किंवा बिडाच्या काहिलीला नीट तेल लावून चांगले गरम करून घ्यावे. तवा चांगला गरम झाला की आच मध्यम करून तव्याच्या कडेने २ डाव भरून घावनाचे मिश्रण तव्यावर पसरवून घ्यावे. मिश्रण एकसंध पसरावे. आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे.
  7. साधारण मंद आचेवर ४ मिनिटे शिजवले की घावन तव्याच्या कडा सोडायला लागते . एका ताटात केळीचे पान किंवा सुती कापड पसरून त्यावर घावन काढून घ्यावे. घावन हे मऊ आणि लुसलुशीत असते म्हणून ते दुसऱ्या बाजूने फिरवून शिजवले जात नाही !
  8. अशाच प्रकारे सगळे घावन बनवून घेऊ. पुढचे घावन तव्यावर घालण्याआधी तव्याबर तेल पसरवायला विसरू नये!
  9. गरमागरम घावन नारळाच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या दूधासोबत वाढावे!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/ghavan-recipe-in-marathi/