Mango Popsicles recipe in Marathi- मँगो पॉपसिकल्स- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: १५ मिनिटे
किती बनतील: १२-१४
साहित्य:
  • १.५ कप = ३०० ग्रॅम्स, ताज्या पिकलेल्या आंब्याच्या साली काढून बारीक फोडी ( हापूस/ केसर/बदामी आंबा घेतला तरी चालेल )
  • ४ टेबलस्पून = ८० ग्रॅम्स साखर
  • ३/४ कप = १९० ग्रॅम्स दही
  • १/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स ( नसल्यास वगळला तरी चालेल )
Instructions
  1. कृती :
  2. मी हे पॉपसिकल्स बनवण्यासाठी हिप्पुसे आंबे वापरले आहेत . आंब्याच्या फोडी एका ब्लेंडरच्या भांड्यात घालून त्यातच साखर घालावी. आंब्याच्या गोडव्यावर साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आंब्याच्या फोडी आणि साखर एकत्र ब्लेंडरमधून फिरवून घ्यावे.
  3. ही प्युरी घट्ट असते , त्यात १/२ कप पाणी घालून परत एकदा ब्लेंडरमधून फिरवून घ्यावे. एका बाऊलमध्ये काढून घ्यावी.
  4. त्याच ब्लेंडरच्या भांड्यात दही आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र घुसळून घ्यावा . हे दही आंब्याच्या प्युरीत नीट चमच्याने एकत्र ढवळून घ्यावे .
  5. हे पॉपसिकल्सचे मिश्रण तयार आहे . साच्यांमध्ये भरून घेऊ . साच्यांमध्ये अर्ध्यापर्यंत मिश्रण भरून त्यात १-२ छोट्या फोडी आंब्याच्या घालू आणि वर परत साच्यांच्या पाऊण भागापर्यांतच मिश्रण भरून घेऊ. आंब्याच्या फोडींऐवजी स्ट्रॉबेरीचे, काळ्या द्राक्षांचे किंवा किवीचे तुकडे घातलेत तरी छान दिसतात !
  6. हे पॉपसिकल्स किमान ६ तासांसाठी किंवा जमल्यास पूर्ण १ दिवसासाठी फ्रिझरमध्ये सेट होण्यास ठेवावेत .
  7. थंडगार पॉपसिकल्स साच्यांमधून काढून सर्व करावे . बच्चे पार्टी तर जाम खूश होते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/mango-popsicles-recipe-marathi/