डाळ वडा- Dal Vada recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snack
Cuisine: Indian
 
Ingredients
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिटे
किती बनतील: १५-२०
साहित्य :
  • १ कप = २०० ग्रॅम्स चण्याची डाळ , स्वच्छ धुऊन , रात्रभर किंवा किमान ४ तास पाण्यात भिजवून ठेवावी
  • १/२ कप= १२५ ग्रॅम्स मूग डाळ , स्वच्छ धुऊन , रात्रभर किंवा किमान ४ तास पाण्यात भिजवून ठेवावी
  • १ मध्यम आकाराचा कांदा = ७० ग्रॅम्स बारीक चिरून
  • २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • १ इंच आल्याचा तुकडा किसून
  • १०-१२ कढीपत्ता बारीक चिरून
  • १/४ टीस्पून हिंग
  • १ टीस्पून जिरे
  • १/२ टीस्पून लाल मिरची पूड
  • मीठ चवीप्रमाणे
  • १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
  • तळण्यासाठी तेल
Instructions
कृती:
  1. डाळींचे पाणी पूर्णपणे काढून घ्यावे . एका चाळणीत १५ मिनिटे डाळ ठेवून पाणी निथळू द्यावे. दोन्ही डाळी पाणी न घालता मिक्सरमधून जाडसर वाटून घ्याव्यात . चण्याच्या आणि मुगाच्या डाळीचे अख्खे तुकडे राहिले तर ते वड्यांत दिसायला चांगले दिसतात !
  2. एका बाऊलमध्ये वाटलेल्या डाळींची पेस्ट , कांदा , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या , आले, लाल मिरची पूड, जिरे, हिंग, , कोथिंबीर आणि १ टीस्पून मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
  3. डाळ वड्याचे मिश्रण तयार आहे . हाताच्या तळव्यांना तेल लावून आपल्याला आवडतील त्या आकारात गोल चपटे वडे थापून घ्यावेत. हे वडे चटकन तळावेत .
  4. वडे तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर तापवून घ्यावे. आच मंद करून हे वडे कढईच्या बाजूने हलकेच तेलात सोडावेत. हा डाळीचे वडे असल्याने ते बाहेरून लगेच लाल होतात परंतु आतपर्यंत शिजत नाहीत. म्हणून हे वडे मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. एका किचन टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत. अशाच प्रकारे सारे वडे तळून घ्यावेत.
  5. हे डाळ वडे गरम गरमच हिरव्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खावयास द्यावे!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/dal-vada-recipe-in-marathi/