अंड्याची कचोरी- Anda/Egg Kachori recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snack
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
बनवण्यास वेळ : २० मिनिटे
कितीजणांसाठी बनतील: ३ ते ४
साहित्य :
  • १ १/२ कप= २०० ग्रॅम्स मैदा , चाळून घ्यावा
  • १/२ टीस्पून ओवा
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल
  • ३ अंडी उकडून
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • १/२ टीस्पून काळी मिरी बारीक कुटून पावडर
  • १ टीस्पून लिंबाचा रस
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ टेबलस्पून मनुका बारीक चिरून
Instructions
कृती:
  1. आपण पहिल्यांदा कचोरीच्या बाहेरच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊ. एका परातीत मैदा, मीठ चवीप्रमाणे , ओवा आणि १ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घेऊ. हे सारे घटक मैद्यात दोन्ही हातांनी चांगले रगडून घेऊ. मैद्याचे टेक्सचर ब्रेड क्रम्ब्स सारखे दिसले पाहिजे.
  2. आता थोडे थोडे पाणी घालून मैद्याचा घट्ट गोळा बनवून घेऊ. मी अर्धा कप पाणी वापरले आहे पीठ मळण्यासाठी. मैद्याच्या गोळ्याला तेलाचा हात लावून परत चांगले तिंबून घ्यावे . स्ट्रेच अँड पूल या पद्धतीने पीठ चांगले मळून घ्यावे . माहितीसाठी हिंदी चॅनेल वर विडिओ नक्की पहा ! https://www.youtube.com/watch?v=Q5M57R7i5h0
  3. असे किमान ३-४ वेळा करून पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे .
  4. तोपर्यंत अंड्याचे सारण बनवून घेऊ . अंडी किसून घ्यावीत. किसणीच्या मोठ्या किंवा मध्यम भोकांचा वापर करावा किसण्यासाठी ! मीठ चवीप्रमाणे घालावे, कुटलेली काळी मिरी , कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मनुका आणि लिंबाचा रस घालून एकत्र करून घेऊ. अंड्याचे सारण तयार आहे . आवडत असल्यास लाल मिरची पूड, चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता !
  5. कचोऱ्या बनवण्यासाठी मैद्याच्या गोळ्याचा एक छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा बनवून घ्यावा . मोदकाच्या पारीप्रमाणे खोलगट पारी बनवून त्यात १-२ चमचे अंड्याचे सारण घालून कडा एकत्र करून बंद करून घ्याव्यात.
  6. कचोरी हलक्या हाताने गोल वळून घ्याव्यात. अशा प्रकारे साऱ्या कचोऱ्या बनवू घ्याव्यात ! इतक्या मापात १२-१५ कचोऱ्या बनतात!
  7. कचोऱ्या तळण्यासाठी एका कढईत कचोऱ्या बुडतील इतके तेल घालून चांगले तापवून घ्यावे . तेल तापले की गॅस मंद करून बारीक आचेवर कचोऱ्या तळाव्यात जेणेकरून त्या आतपर्यंत तळल्या जातील! व्यवस्थित तेलात कचोऱ्या वर खाली करून सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात . करपू देऊ नयेत . कचोरीचा एक भरणा तळायला मला मंद आचेवर ५ मिनिटे लागली.
  8. गरमागरम खुसखुशीत अंड्याच्या कचोऱ्या टोमॅटो केचअप सोबत किंवा नारळाच्या किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खावयास द्याव्यात !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/anda-egg-kachori-recipe-marathi/