ऑम्लेट करी-Omelette Curry recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Main
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ३५ मिनिटे
कितीजणांसाठी वेळ : ४-५
साहित्य:
ऑम्लेटसाठी -
४ अंडे
१ लहान कांदा = ५० ग्रॅम्स बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
२ टेबलस्पून दूध
२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
तेल
मीठ चवीनुसार
करी / रस्श्यासाठी :
१ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरून
१/२ कप कोथिंबीर
१ मोठा टोमॅटो = १०० ग्रॅम्स बारीक चिरून
१/२ कप = ४० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
३ हिरव्या मिरच्या
८-१० लसणीच्या पाकळ्या
१ इंच आले बारीक चिरून
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जिरे
पाव टीस्पून हिंग
१/२ टीस्पून हळद
१ १/२ टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर
१ टीस्पून धणे पावडर
१ टीस्पून गरम मसाला
Instructions
कृती :
सर्वप्रथम मसाल्याच्या वाटणासाठी एका पॅन मध्ये सुके खोबरे मंद आचेवर खरपूस रंगावर भाजून घेऊ. एका ताटलीत काढून घ्यावे.
त्याच गरम पॅन मध्ये २-३ टेबलस्पून तेल घालून आले आणि लसूण घालून घ्यावे. लसूण गुलाबी रंगावर परतून झाली की त्यात चिरलेला कांदा घालून
खरपूस करड्या रंगावर तळून घ्यावा.
मंद ते मध्यम आचेवर ८ मिनिटांत मी कांदा परतून घेतलाय . आता त्यात कोथिंबीर घालून तेलात परतून घ्यावी . नंतर भाजलेला कांदा घालून हा मसाला नीट एकत्र करून गॅस बंद करावा . मसाला पूर्ण थंड होऊ द्यावा .
मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यावा . वाटण्यासाठी मी ३/४ कप पाण्याचा वापर केला आहे . मिश्रण चांगले गंधगोळीसारखे वाटून घ्यावे . जाडसर ठेवू नये.
एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी करून घ्यावी. हिरव्या मिरच्या घालाव्यात, थोडी कोथिंबीर घालून मिसळून घ्यावी. आता आच मंद करून तेलात हळद आणि लाल मिरची पूड घालून परतून घ्यावी. करपू देऊ नये . तेलात मिरची पूड घातल्याने रस्श्याला छान लालसर तर्री येते.
आता टोमॅटो घालून घेऊ, त्यात थोडे मीठ घालावे , मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजायला मदत होते. आच मंद करून झाकण घालून शिजु द्यावे . टोमॅटोऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता!
३ मिनिटे टोमॅटो झाकून शिजवल्यावर त्यात वाटलेला मसाला , धणे पावडर आणि गरम मसाला पावडर घालावा . हे सगळे मसाले ५-६ मिनिटे तरी चांगले परतून घ्यावेत . कडेने तेल सुटेपर्यंत मसाला परतावा.
रस्सा थोडा घट्टच ठेवावा म्हणून दीड कप गरम पाणी घालावे. मीठ चवीनुसार घालून घ्यावे. मंद आचेवर झाकण घालून रस्सा हळूहळू शिजू द्यावा! रस्सा शिजतोय तोपर्यंत ऑम्लेट बनवून घ्यावे.
एका भांड्यात ४ अंडी फोडून घ्यावीत , त्यात दूध, मीठ , बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर आणि हिरव्य मिरच्या घालून फेटून घ्यावे. जितके चांगले मिश्रण फेट्ले तितकेच छान फुगीर ऑम्लेट बनतात .
एका सपाट तव्यात १ टीस्पून तेल घालून तव्यात नीट पसरून घ्यावे . आपण या मिश्रणाचे २ ऑम्लेट्स बनवणार आहोत. म्हणून अर्धे मिश्रण तव्यात घालून पसरवून ऑम्लेट दोन्ही बाजूंनी परतवून घ्यावे . अशाच प्रकारे दुसरे ऑम्लेटही बनवून घ्यावे. ऑम्लेटचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत .
रस्श्यावरचे झाकण काढून त्यात हे ऑम्लेटचे तुकडे घालून मंद आचेवर फक्त १ मिनिटासाठी झाकून मुरू द्यावे . त्यानंतर गॅस बंद करावा आणि ही ऑम्लेट करी गरम गरम चपाती, पराठा, पाव किंवा भातासोबत वाढावी!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/omelette-curry-recipe-in-marathi/