बॉम्बे कराची हलवा- Bombay Karachi Halwa recipe in Marathi
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
शिजवण्यासाठी वेळ: १५ मिनिटे
साहित्य :
  • ३/४ कप + २ टेबलस्पून = २०० ग्रॅम्स साखर
  • १/२ कप = ५० ग्रॅम्स कॉर्नफ्लोअर
  • १ टीस्पून लिंबाचा रस
  • १ टीस्पून वेलची पावडर
  • १ टेबलस्पून मगज बीज
  • १ टेबलस्पून = ५-६ काजू
  • पाणी
  • हिरव्या खाद्य रंगाचे काही थेंब
  • तूप
Instructions
कृती:
  1. एका मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या बाऊलमध्ये साखर घालून घेऊ. त्यात १५० ml = १/२ कप + २ टेबलस्पून पाणी घालावं. लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे.
  2. मायक्रोवेव्ह सेटीन्ग्स :
  3. a) मोड : मायक्रोवेव्ह b) पॉवर : ९०० वॅट ( हाय ) c) वेळ : ६ मिनिटे d) स्टार्ट चे बटण दाबून झाकण न घालता साखर विरघळू द्यावी.
  4. साखर विरघळतेय तोपर्यंत आता आपण कॉर्न फ्लोअरचे मिश्रण बनवून घेऊ. अर्धा कप पाण्यात अर्धा कप कॉर्न फ्लोअर घालून फेटून घ्यावे गुठळी राहू देऊ नये .
  5. ६ मिनिटांनी साखर विरघळली की त्यात कॉर्न फ्लोअरचे मिश्रण ढवळून घालावे . नीट एकत्र करून घ्यावे.
  6. मायक्रोवेव्ह सेटीन्ग्स :
  7. a) मोड : मायक्रोवेव्ह b) पॉवर : ९०० वॅट ( हाय ) c) वेळ : ३ मिनिटे d) स्टार्ट चे बटण दाबून झाकण न घालता शिजू द्यावे.
  8. ३ मिनिटांत हे कॉर्न फ्लोअरचे मिश्रण जसे जसे शिजू लागते तसे घट्ट होत जाऊन जेलीसारखे पारदर्शक दिसू लागते . भांडे ओव्हन मधून बाहेर काढून त्यात आपल्या आवडीचा खाण्याचा रंग २-३ थेंब घालावा . १ टेबलस्पून तूप न विसरता मिसळून घ्यावे. या हलव्यात तूप अतिशय महत्त्वाचे आहे , तूप कमी घातले तर हलवा कोरडा पडतो.
  9. मायक्रोवेव्ह सेटीन्ग्स :
  10. a) मोड : मायक्रोवेव्ह b) पॉवर : ९०० वॅट ( हाय ) c) वेळ : ३ मिनिटे d) स्टार्ट चे बटण दाबून झाकण न घालता शिजू द्यावे.
  11. ३ मिनिटांनंतर भांडे बाहेर काढून एकदा मिश्रण ढवळून घ्यावे. त्यात मगज बीज , काजूचे तुकडे आणि वेलची पावडर घालून अजून १ टेबलस्पून तूप घालून नीट एकत्र मिसळून घ्यावे. तुपामुळे एक छानपैकी चमक येते या हलव्याला!
  12. मायक्रोवेव्ह सेटीन्ग्स :
  13. a) मोड : मायक्रोवेव्ह b) पॉवर : ९०० वॅट ( हाय ) c) वेळ : ३ मिनिटे d) स्टार्ट चे बटण दाबून झाकण न घालता शिजू द्यावे.
  14. ३ मिनिटांनंतर हलवा छानपैकी स्मूथ आणि पारदर्शक होतो. भांडे ओव्हनच्या बाहेर काढून एका काचेच्या ट्रेला किंवा चौकोनी/गोल थाळीला तुपाचा हात लावून थापून घ्यावा. चमच्याच्या साहाय्याने हलवा चौरस आकारात जाडसर थापून घ्यावा. ३० मिनिटे बाहेरच थंड होऊ द्यावा ( फ्रिजमध्ये ठेवू नये ) .
  15. थंड झाल्यावर हलव्याच्या आपल्या हव्या त्या आकारात वड्या कापून घ्याव्यात!
  16. बॉम्बे कराची हलवा तयार !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/karachi-halwa-recipe-in-marathi/