पियुष- Piyush recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Drinks
Cuisine: Indian
 
Ingredients
साहित्य :
  • ३ कप = ६०० ग्रॅम्स दही
  • १ कप = २५० ग्रॅम्स आम्रखंड ( आंब्याचे श्रीखंड )
  • १ कप= २५० ग्रॅम्स केशर विलायची श्रीखंड
  • ४ टेबलस्पून =६० ग्रॅम्स साखर
  • १/४ टीस्पून जायफळ पावडर
  • १/४ टीस्पून वेलची पावडर
  • थोडे केशराचे धागे आणि पिस्त्याचे काप वरून सजवण्यासाठी
Instructions
कृती:
  1. आपण या रेसिपीसाठी ६०० ग्रॅम्स दही वापरले आहे .. ३०० ग्राम दह्याचे आपण केशर वेलची पियुष बनवूं आणि उरलेल्या ३०० ग्रॅम्स दह्याचे आंबा पियुष बनवू . पहिल्यांदा आपण केशर वेलचीयुक्त पियुष बनवून घेऊ. एका ब्लेंडरच्या भांड्यात दही, केशर वेलची श्रीखंड , २ टेबलस्पून साखर किंवा चवीनुसार , वेलची पावडर, आणि जायफळ पावडर घालून एकत्र घुसळून घेऊ. पियुष तयार आहे , जर पियुष फार घट्ट वाटले तर त्यात १-२ टेबलस्पून दूध घालून फिरवून घ्यावे .
  2. अशाच प्रकारे आंबा पियुष बनवून घ्यावे .
  3. हे दोन्ही पियुष वेगवेगळ्या भांड्यांत काढून , झाकण घालून फ्रिजमध्ये किमान २ तासांसाठी थंड होऊ द्यावे आणि मगच थंड प्यायला द्यावे . प्यायला देताना वरून केशराचे धागे आणि पिस्त्याचे काप घालावयास विसरू नये !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/piyush-recipe-in-marathi/