मलई कुल्फी- Malai Kulfi recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : २४ तास
शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
किती बनतील: १५-१८
साहित्य:
 • १ लिटर घट्ट सायीचे दूध ( म्हशीचे दूध घेतले तर उत्तम )
 • ४०० ग्रॅम्स कंडेन्सड मिल्क
 • २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
 • १ टेबलस्पून बदाम
 • १ टेबलस्पून काजू
 • १ टेबलस्पून पिस्ता
 • ४-५ हिरव्या वेलच्या
Instructions
कृती:
 1. एका मोठ्या कढईत कंडेन्सड मिल्क घालावे. त्यात दूध घालून नीट ढवळून एकत्र करून घ्यावे, गुठळी राहू देऊ नये! थोडे पाव कप दूध वेगळे काढून घ्यावे, त्यात कोर्नफ्लोर घालून नीट पेस्ट बनवून घ्यावी.
 2. नोट : कुल्फी बनवताना नेहमी कच्च्या दुधात कंडेन्सड मिल्क मिसळून मगच उकळायला ठेवावे. तरच कुल्फी चांगली दाटसर बनते! आधी दूध उकळून त्यात कंडेन्सड मिल्क नंतर मिसळू नये.
 3. हे दुधाचे मिश्रण मध्यम आचेवर उकळू द्यावे . त्यात जाडसर कुटलेली वेलची पावडर घालावी. वेलची पावडर आवडत नसल्यास जायफळाची पूड घातली तरी चालेल!
 4. दुधाला उकळी आली की आच मंद करून दुधात कोर्नफ्लोअरचे मिश्रण घालून नीट ढवळून घ्यावे . कोर्नफ्लोअरमुळे कुल्फीला घट्टपणा येतो. दूध मधून मधून सारखे ढवळत राहून कढईच्या कडेला चिकटणारी साय दुधात मिसळत जावी जेणेकरून दूध घट्ट होईल.
 5. जवळजवळ २० मिनिटांत दूध आटून अर्ध्यापर्यंत येते. आपल्याला दूध एक तृतीयांश आटेपर्यंत आचेवर ठेवायचे आहे .
 6. अर्ध्या तासात दूध आतून घट्ट होते . आता त्यात बदाम, काजू आणि पिस्त्याची जाडसर [पावडर घालून ढवळून घ्यावे. गॅस बंद करून थंड होऊ द्यावे.
 7. मिश्रण थंड झाल्यावर ते कुल्फीच्या साच्यात किंवा घरी छोटे चहाचे उभट ग्लास असतील तर त्यात भरून फ्रिझरमध्ये किमान २४ तासांसाठी ठेवावेत .मस्त कुल्फी जमून येते ! साचे नसतील तर एखाद्या गोल किंवा चोकोनी प्लॅस्टिकच्या डब्यांत कुल्फीचे मिश्रण घालू शकता!
 8. २४ तासांनंतर कुल्फी खाण्यासाठी एकदम तयार ! ही कुल्फी छान घट्ट जमते आणि लवकर विरघळतही नाही !
 9. माझे कुल्फीचे मोल्ड्स आवडले असतील तर तुम्ही ते इथून ऑर्डर करू शकता
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/malai-kulfi-recipe-in-marathi/