मेथी ठेपला-Methi Thepla recipe in Marathi-Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ : २० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ :२५ मिनिटे
किती बनतील : १०- १२
साहित्य:
१.५ कप = २२५ ग्रॅम्स गव्हाचे पीठ
१/४ कप = ३० ग्रॅम्स बेसन
२ कप मेथीची पाने
तेल
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१/२ टीस्पून हळद
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून साखर
१/२ टीस्पून लाल मिरची पूड
१/४ कप =६० ग्रॅम्स दही
मीठ चवीप्रमाणे
Instructions
कृती :
ठेपल्यांचे पीठ मळण्यासाठी एका परातीत किंवा मोठ्या भांड्यात दही, साखर , मीठ ( १ टीस्पून किंवा चवीनुसार ) , हळद , लाल मिरची पूड , हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. साखर पूर्ण विरघळली गेली पाहिजे . आता चिरलेली मेथीची पाने घालून नीट एकत्र करून घ्यावे.
आता गव्हाचे पीठ, बेसन आणि १ टेबलस्पून तेल घालून नीट एकत्र मळून घ्यावे. हिरव्या पालेभाज्यांत भरपूर पाणी असते , म्हणून पीठ मळताना जास्त वरचे पाणी घालू नये . नाहीतर मळलेली कणिक ओलसर होते आणि ठेपले लाटायला कठीण होतात . जास्तीतजास्त पाव कप पाणी वापरून कणिक घट्ट मळावी . कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी.
१० मिनिटांनंतर कणकेचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत. गव्हाच्या पीठावर ठेपले गोल आणि पातळ लाटून घ्यावेत.
मोठ्या आचेवर तवा चांगला तापवून घ्यावा . नंतर आच माध्यम ठेवून त्यावर ठेपले दोन्ही बाजूंनी खरपूस तेल लावून भाजून घ्यावेत. एक ठेपला भाजून घ्यायला जास्तीतजास्त २ मिनिटे लागतात !
हा स्वादिष्ट नाश्ता गुजराती मेथी ठेपला कैरीच्या गोड लोणच्याबरोबर ( गुजराती चुंदा ) किंवा लिंबाच्या गोड लोणच्यासोबत, दह्यासोबत , चटणीसोबत किंवा नुसतेच खायला ही फार छान लागतात ! डब्यासाठी तर उत्तमच !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/methi-thepla-recipe-in-marathi/