मूग डाळ आणि काकडीची कोशिंबीर-हेसरू बेले कोसंबरी- MOONG DAL KAKDI KOSHIMBIRI -HESARU BELE KOSAMBARI- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Salad
Cuisine: Indian
Ingredients
तयारीसाठी वेळ: १० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : २ मिनिटे
साहित्य:
१०० ग्रॅम्स मूग डाळ - पाण्याने स्वच्छ धुऊन २ तास पाण्यात भिजत घालावी
२५० ग्रॅम्स काकडी ( चौकोनी तुकडे करून )
१/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
मीठ चवीनुसार
२ टेबलस्पून लिंबाचा रस
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ - १/२ टीस्पून साखर
१/४ कप ओल्या नारळाचा चव
१ टेबलस्पून तूप
१ टीस्पून मोहरी
चुटकीभर हिंग
१ टेबलस्पून उडीद डाळ
Instructions
कृती :
एका मोठ्या भांड्यात काकडीचे तुकडे, भिजवलेली मूग डाळ , हिरव्या मिरच्या , मीठ, साखर , लिंबाचा रस, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र मिसळून घ्यावी.
फोडणीसाठी १ टेबलस्पून तूप गरम करावे. त्यात उडीद डाळ टाकून ती खरपूस रंगावर येईस्तोवर परतून घ्यावी. फक्त करपू देऊ नये. मग मोहरी घालून तडतडू द्यावी. हिंग घालून परतून घ्यावे. ही फोडणी कोशिंबिरीवर घालून मिसळून घ्यावी. वरून ओले खोबरे भुरभुरावे. झाली आपली कोशिंबीर तयार !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/moong-dal-kakdi-koshimbiri/