आंबा लस्सी - Mango Lassi recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Drinks
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : ५ मिनिटे
कितीजणांसाठी बनेल - २ ग्लास
साहित्य :
  • १ कप = २५० ग्रॅम्स आंब्याचा गर ( हापूस किंवा इतर कुठलाही गोड आंबा )
  • १ कप = २०० ग्रॅम्स घट्ट दही
  • २-३ टेबलस्पून दूध
  • २ टीस्पून साखर ( आंब्याच्या गोडव्यानुसार साखर कमी जास्त वापरावी )
  • काजू, बदाम आणि पिस्त्याची कुटून जाडसर पावडर
  • १/४ टीस्पून वेलची पावडर
  • मलई बर्फीचा लहानसा तुकडा ( किंवा थोडा खवा ) - नाही घातला तरी चालेल
Instructions
कृती :
  1. एका मिक्सरच्या भांड्यात घट्ट दही , आंब्याचा गर , साखर , दूध आणि वेलची पावडर घालून चांगले घुसळून घ्यावे. ही घट्ट , मलईदार लस्सी पिण्यास देण्याआधी कमीत कमी ३० मिनिटे तरी फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे.
  2. आंबा लस्सी ग्लासमध्ये घालून त्यावर मलई बर्फीचे आणि बदाम,काजू, पिस्त्याचे काप घालून सजवावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/mango-lassi-recipe-in-marathi/