कैरीची चटणी- Kairichi Chutney recipe in Marathi- Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Accompaniment
Cuisine: Indian
Ingredients
साहित्य :
चटणी प्रकार १ : कैरी खोबऱ्याची चटणी
१ कप= १०० ग्रॅम्स किसलेलं ओले खोबरे
२ मध्यम आकाराच्या कैऱ्या = १५० ग्रॅम्स
४-५ लसणीच्या पाकळ्या
१ टीस्पून साखर
४ हिरव्या मिरच्या
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी :
तेल
१०-१२ कढीपत्ता
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून चण्याची डाळ
चुटकीभर हिंग
चटणी प्रकार २ : कैरी पुदिन्याची चटणी
१ मध्यम आकाराच्या कैऱ्या = १५० ग्रॅम्स
१/२ कप पुदिन्याची पाने
१/२ कप = ७५ ग्रॅम्स किसलेला गूळ
१/२ टीस्पून हळद
४-५ लसणीच्या पाकळ्या
१/२ टीस्पून भाजलेली जिऱ्याची पावडर
४-५ हिरव्या मिरच्या
मीठ चवीनुसार
Instructions
कृती :
चटणी प्रकार १ : कैरी खोबऱ्याची चटणी
कैऱ्या स्वच्छ धुऊन , साली काढून , किसून घ्याव्यात . किसल्यानंतर त्यांचे वजन जवळपास ७५ ग्रॅम्स होते. एका मिक्सरच्या भांड्यात किसलेली कैरी, किसलेले खोबरे, लसूण, हिरव्या मिरच्या , साखर आणि मीठ घालून थोडे पाणी ( पाव कप ) घालून बारीक वाटून घ्यावे.
चटणीला फोडणी देण्यासाठी २-३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात चण्याची डाळ घालावी. डाळ थोडी लालसर परतली कि त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून चरचरीत फोडणी होऊ द्यावी. ही फोडणी चटणीवर घालून मिसळून घ्यावी . चटणी तयार झाली.
चटणी प्रकार २ : कैरी पुदिन्याची चटणी
मिक्सरच्या भांड्यात किसलेली कैरी, पुदिन्याची पाने, लसूण, हिरव्या मिरच्या , हळद , जिरे पावडर , मीठ आणि किसलेला गूळ घालून घट्ट आणि बारीक चटणी वाटून घ्यावी. चटणी वाटताना १ टेबलस्पून पाणी मी वापरले आहे. फार पातळ करू नये. झाली चटणी तयार .
या दोन्ही चटण्या हवा बंद बरणीत भरून ठेवल्यास फ्रिजमध्ये ८ दिवस टिकून राहतात !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/kairichi-chutney-recipe-in-marathi/