साबुदाणा वडा | Sabudana Vada in Marathi | Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
किती बनतील : २०-२५
 • साहित्य:
 • १ कप = २०० ग्रॅम्स साबुदाणे
 • ६ मध्यम आकाराचे बटाटे = ४५० ग्रॅम्स , उकडून, साली काढून
 • १/२ कप = १०० ग्रॅम्स शेंगदाण्याचा भाजून, साली काढून जाडसर कूट
 • ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • १ टीस्पून जिरे
 • २ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
 • मीठ
 • तळण्यासाठी तेल
चटणी :
 • ३/४ कप = २०० ग्राम दही
 • १/२ कप = ५० ग्राम खवलेला ओला नारळ
 • २ टीस्पून साखर
 • मीठ
 • १ हिरवी मिरची
Instructions
कृती :
 1. साबुदाणे ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन मगच भिजत घालून ८ ते १० तासांसाठी किंवा कमीत कमी ३-४ तासांसाठी ठेवावेत . साबुदाणे भिजवताना फक्त ते बुडतील इतकेच पाणी घालावे जेणेकरून ते पाणी पूर्ण शोषून घेतील. जास्त पाणी घातले तर ते चिकट आणि बुळबुळीत होतात .
 2. एका मोठ्या भांड्यात भिजवलेले साबुदाणे आणि उकडलेले बटाटे नीट लगदा करून एकत्र करून घ्यावे. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरच्या, जिरे , मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालून एकत्र गोळा करून घ्यावा.
 3. वड्यांचे मिश्रण तयार आहे . आपल्याला आवडतील त्या आकाराचे लहान मोठे गोळे करून त्यांना हलक्या हाताने दाबून चपटे वडे बनवून घ्यावेत.
 4. वडे तळण्यासाठी कढईत तेल तापवून घ्यावे. तेलात वडे पूर्ण बुडतील एवढेच तेल घालावे. तेल चांगले तापले की मंद ते मध्यम आचेवर वडे चांगले सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यावेत.
 5. आप्पे पात्रात कमी तेल घालूनसुद्धा वडे चांगले बनतात . आप्पे पात्र तापवून घेतले की आच मध्यम करून त्यात वड्यांचे मिश्रण चमच्याने घालून घ्यावे . त्याआधी पात्राला तेलाचा हात जरूर लावावा . चमच्याने फिरवून घेत वडे खरपूस टाळून घ्यावेत.
 6. चटणी बनवण्यासाठी ओले खोबरे आणि मिरची मिक्सरमधून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावी. एका भांड्यात दही , साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून नीट फेटून घ्यावे. दह्यात गुठळ्या राहू देऊ नये. त्यात वाटलेला मसाला घालून नीट ढवळून घ्यावी . ही चटणी थोडी पातळ असते कारण त्यात वडे बुडवून खायला फार चविष्ट लागतात ! म्हणून मी अर्धा कप पाणी हळूहळू घालून चटणी थोडी पातळ करून घेतली आहे.
 7. गरमागरम साबुदाणा वडे नारळाच्या दह्यातल्या चटणीसोबत वाढावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/sabudana-vada-in-marathi/