आवडीप्रमाणे काजू, बदाम, आणि पिस्ता जाडसर कुटून किंवा त्यांचे पातळ काप करून
१/२ टीस्पून वेलची पावडर
१/४ टीस्पून जायफळ पावडर
थोडे केशराचे धागे ( १ टेबलस्पून हलक्या गरम दुधात भिजवून )
Instructions
कृती :
सर्वप्रथम चक्का म्हणजे श्रीखंडासाठी लागणारे घट्ट दही बनवण्यासाठी :
आपल्याला २५० ग्रॅम्स चक्क्याची गरज आहे म्हणून आपण ८०० ग्रॅम्स दही एका मलमलच्या किंवा सुती पातळ कापडात बांधून २ तासांसाठी किचन ओट्यावर किंवा नळावर बांधून ठेवू. खाली दह्याचे पाणी म्हणजेच व्हे गोळा करण्यासाठी एक भांडे ठेवू. दोन तासांनी दह्याचे गाठोडे फ्रिजमध्ये याच प्रकारे ६ ते ७ तासांसाठी किंवा रात्रभर बांधून ठेवायचे आहे म्हणजे उरलेसुरलेले पाणीसुद्धा निघून जाईल . आपल्याला छान असा घट्ट मऊ चक्का मिळतो. चुकूनही २ तासांपेक्षा जास्त वेळ दही बाहेर टांगून ठेवू नये , आंबट होते .
दह्याचे पाणी हे पौष्टिक असते ते फेकून न देता त्यात तांदळाचे पीठ, आले-लसूण-मिरच्या-जिरे यांची पेस्ट घालून घावन किंवा धिरडे बनवावेत . चविष्ट होतात .
एका मोठ्या बाउल मध्ये चक्का , साखर घालून फेटून घ्यावे . दह्याच्या गुठळ्या राहू न देता साखर पुर्णतः विरघळेपर्यंत चांगले फेटून घ्यावे. इलेक्ट्रिक बीटर चा वापर केला तरी चालतो.
आंब्याचा गर घालून नीट मिसळून घ्यावा. अगदी एकत्र चांगले फेटून घ्यावे. हे आपले आम्रखंड तयार आहे .
आता आम्रखंडाला राजेशाही बनवण्यासाठी आटवलेली रबडी किंवा किसलेला खवा, मलाई बर्फी किंवा आंबा कलाकंद किसून घालावा ( ५० ग्रॅम्स )
आता केशराचे दूध, वेलची पावडर , जायफळ पावडर घालून नीट मिसळून घ्यावे.
काजू,बदाम, पिस्त्याचे काप आणि चारोळी घालून ढवळून घ्यावे. चारोळ्यांशिवाय श्रीखंडाला मजाच नाही बुवा !
वाढण्याआधी किमान २ तास तरी फ्रिजमध्ये आम्रखंड थंड होऊ द्यावे.
तळटीप : साखरेची मात्रा आपल्या आवडीनुसार आणि आंब्याच्या गोडव्यावर ठरवावी !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/amrakhand-recipe-in-marathi/